नवी दिल्ली- उत्तर प्रदेशात अवैध मदरशांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आपला रिपोर्ट सरकारकडे सादर केला आहे. या रिपोर्टमध्ये तब्बल १३ हजार मदरशा बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यातील जास्त करुन मदरसे नेपाळच्या सीमेवर असल्याचं सांगण्यात येतंय. (SIT Report Identifies 13000 Illegal Madarsas In UP Recommends Shutdown )
एसआयटीच्या रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये शेकडोंच्या संख्येने मदरसे आहेत. त्यातील अवैध मदरशांची संख्या तब्बल १३ हजार असल्याचा रिपोर्ट एसआयटीने सादर केला आहे. त्यामुळे येत्या काळात या मदरशांवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नेपाळ सीमेजवळ असलेल्या महारगंज, शरावस्ती आणि बहारिच या जिल्ह्यांमध्ये अवैध मदरशांची संख्या जास्त आहे. या जिल्ह्यांमध्ये पाचचे पेक्षा जास्त अवैध मदरसे असल्याचं एसआयटी रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. इतर जिल्ह्यातील मदरशांची संख्याही मोठी आहे. या मदरशांच्या आर्थिक गणिताबाबत एसआयटीला शंका आहे.
यूपीमध्ये अवैध मदरशांची चौकशी करण्यासाठी योगी सरकारने एसआयटीची स्थापना केली होती. एसआयटीने आपला रिपोर्ट सादर केला असून यासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. मदरशांनी आपले उत्पन्न आणि खर्च यांचा हिशोब सादर केलेला नाही. मीडिया रिपोर्टमधील माहितीनुसार, एसआयटीने शंका व्यक्त केलीये की, टेरर फंडिंगच्या माध्यमातून जमा केलेली रक्कम मदरशांमध्ये वापरली जात आहे.
मदरशांनी असा दावा केलाय की लोकांकडून मिळालेल्या देणगीच्या माध्यमातून मदरसे चाललात. पण, मदरशांनी यासंदर्भातील माहिती उपलब्ध करुन दिलेली नाही. असा दावा करण्यात आला आहे की, जास्तकरुन मदरशांना विदेशातून निधी मिळतो. देशविरोधातील कारवायांसाठी देशातील मदरशांचा वापर केला जात आहे. दरम्यान, योगी सरकार या मदरशांवर काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.