Hathras Stamped  sakal
देश

Hathras Stamped : अखेर सहा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड;हाथरस चेंगराचेंगरीप्रकरणी एसआयटीचा अहवाल सादर

हाथरस चेंगराचेंगरीप्रकरणी आज उत्तर प्रदेश सरकारने उपविभागीय अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांसह सहा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

घुसमटलेले निष्पाप जीव

हाथरस : हाथरस चेंगराचेंगरीप्रकरणी आज उत्तर प्रदेश सरकारने उपविभागीय अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांसह सहा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या ‘एसआयटी’ने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे अहवाल सादर केल्यानंतर त्या आधारावर कारवाई करण्यात आली. या अहवालात हाथरसच्या आणि पीडित असे शंभर लोकांचे जबाब घेतले आहेत. याप्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच या अहवालात प्रवचनकाराच्या नावाचा उल्लेख नाही. दरम्यान, हाथरसप्रकरणी प्रवचनकारावर कारवाई करावी अशी मागणी करत दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून आंदोलन करण्यात आले.

गेल्या आठवड्यात मंगळवारी हाथरस येथे सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले होते. यानुसार अतिरिक्त पोलिस महासंचालक अनुपम कुलश्रेष्ठ आणि आयुक्त चैत्रा व्ही. यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीने तपास सुरू केला आणि चोवीस तासाच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी राज्य सरकारने बुधवारपर्यंत वेळ दिला होता, पण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी भेट दिल्याने आणि प्रशासकीय प्रक्रियेला वेग आणण्याला प्राधान्य दिल्याने ठरलेल्या वेळेत अहवाल सादर करता आला नाही. त्यानंतर अधिकाऱ्यांनी अहवालासाठी आणखी तीन दिवसांचा अतिरिक्त वेळ मागितला. यानुसार आज अहवाल सादर करण्यात आला. अहवालातील शिफारशीनुसार कारवाई होत आहे.

हाथरस येथे दोन जुलै रोजी सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ भाविकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर एक आठवड्याच्या आतच एसआयटीने ३०० पानांचा अहवाल सादर केला. यात प्रवचनकार भोले बाबा याचे नाव नाही. या घटनेला आयोजक व अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. सिकंदराराऊचे उपविभागीय अधिकारी, मंडळ अधिकारी, तहसीलदारांसह सहा जणांना निलंबित केले आहे. यात कचौरा चौकी प्रमुख आणि पोरा चौकी प्रमुख यांचाही समावेश आहे.

‘एसआयटी’ची निरीक्षणे

  •  आयाेजकाच्या गैरव्यवस्थापनामुळे दुर्घटना

  •  उपजिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता कार्यक्रमाला परवानगी

  •  संबंधित अधिकाऱ्यांविरुद्धच्या कारवाईबाबत एसआयटी समाधानी

  •  गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पुरेशी व्यवस्था नव्हती.

  •  बॅरिकेड्स आणि मोकळी जागेची सुविधा नव्हती

  •  दुर्घटनेनंतर आयोजक आणि सहकारी घटनास्थळावरून फरार

‘एसआयटी’तील अधिकारी

  •  पोलिस उपमहासंचालक अनुपम कुलश्रेष्ठ

  •  अलिगड आयुक्त चैत्रा व्ही

न्यायालयीन आयोग

  •  सेवानिवृत्त न्यायाधीश ब्रजेशकुमार श्रीवास्तव

  •  निवृत्त आयपीएस अधिकारी हेमंत राव

  •  सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी भवेशकुमार सिंह

निलंबित अधिकारी

  •  उपजिल्हाधिकारी/उपविभागीय अधिकारी(सिकंदराराऊ): रविंद्रकुमार

  •  मंडळ अधिकारी सिंकदराराऊ): आनंदकुमार

  •  तहसीलदार (सिकंदराराऊ): सुशीलकुमार

  •  प्रभारी निरीक्षक सिकंदराराऊ पोलिस ठाणे: आशिषकुमार

  •  चौकी प्रभारी: मनवीर सिंह आणि पारा चौकी प्रभारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टातल्या टायपिस्टला ४ जॅकेट अन् तासाला १ हजार दिले, AI वापरून याचिका; १२वी पास तरुणाला सरन्यायाधीशांनी झापलं

भारताला जेतेपदाच्या हॅट् ट्रिकची संधी! T20 World Cup 2028 साठी १२ संघ पात्र, कसा असेल उर्वरित ८ जागांसाठीचा मार्ग?

छत्रपती संभाजीनगर हादरलं! ठाकरे गटाच्या उपतालुका प्रमुख कृष्णा राठोड यांच्यावर मध्यरात्री चाकू हल्ला

'तन्वी प्रत्येक भांडणाआधी जाणीवपूर्वक स्मोक करून यायची' बिग बॉसच्या घराबाहेर पडताच रुचिताचा मोठा खुलासा, म्हणाली...

Latest Marathi News Live Update : सोलापुरात घरगुती गॅस ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करताना तांत्रिक अडचणी

SCROLL FOR NEXT