reels
reels 
देश

सोशल मीडियाचा नाद! लग्नापासून ते हनिमुनपर्यंत, सर्वकाही रिलमध्ये, जोडप्याचा व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- सोशल मीडियावर सध्या रिल बनवण्याचा ट्रेंड जोरात आहे. कोणीही रिल बनवू शकतं आणि लोकांसोबत ते शेअर करु शकतं. अनेकजण आपलं खासगी आयुष्य देखील रील्सच्या माध्यमातून दाखवत असतात. काहीजण तर छोट्या-मोठ्या गोष्टी देखील आपल्या फॉलोवर्ससोबत शेअर करत असतात. असाच एक प्रकार इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे.(social media From the wedding to the honeymoon everything in reel the couple video viral news )

एका व्यक्तीने आपल्या लग्नादरम्यान प्रत्येक घटनेची रिल बनवली आहे. या व्यक्तीला 'रिल वाला दूल्हा' म्हणू लागले आहेत. व्यक्तीने आपल्या पत्नीला कुंकू लावतानाचा रिल बनवलाय, इतकंच नाही तर मधुचंद्राच्या दिवशीचा देखील त्याने रिल बनवलाय. त्याच्या या अतिरेकी कृतीमुळे नेटकऱ्यांनी त्याला झापलं देखील आहे. मित्रा, चित्रपटातील आयुष्यातून आता बाहेर ये, असा सल्ला एका नेटकऱ्याने दिला.

विशेष म्हणजे या व्यक्तीला ४ मिलियनपर्यत फॉलोवर्स आहेत. पण, या व्हिडिओला इतर ठिकाणी देखील शेअर करण्यात आलं आहे. इंस्टाग्रामवर memecentral.teb नावाच्या एका पेजवरुन या व्यक्तीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात कॅप्शनमध्ये म्हणण्यात आलंय की, भारतीय लग्नसमारंभात रिल्सचा प्रभाव वाढत आहे.

अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत टीका केली आहे. लग्नासारख्या महत्वाच्या घटनेचा रिल बनवणे काहींनी अयोग्य ठरवलंय. मात्र, काही नेटकऱ्यांनी या व्यक्तीचे समर्थन देखील केले आहे. तो आपल्या आयुष्यात काय करतोय हा त्याचा प्रश्न आहे. शिवाय या माध्यमातून तो आपल्या पत्नीप्रति असलेले प्रेम व्यक्त करत आहे, असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं.

दरम्यान, आजकाल रील्सचा सुळसुळाट झाला आहे. विशेष म्हणजे या रील्स दर्जाहीन असतात. कोणी रेल्वे ट्रॅकवरचा व्हिडिओ टाकतो. कोणी शिविगाळ केल्याचा व्हिडिओ टाकतो. विचित्र हातवारे केल्याचा व्हिडिओ देखील टाकला जोता. मात्र, अशाच रिल्सना मोठ्या प्रमाणात पाहिलं जात असल्याचंही दिसून आलं आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT