Bilkis Bano 
देश

Bilkis Bano Case: "काही दोषी गुन्हेगारांना विशेषाधिकार मिळतोय"; सुप्रीम कोर्टानं व्यक्त केली नाराजी

बिल्किस बानो प्रकरणात सुटका करण्यात आलेल्या आरोपींविरोधात दाखल याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील दोषींची गुजरात सरकारनं मुदतीपूर्वीच सुटका केली आहे. याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टानं नाराजी व्यक्त करणारी टिप्पणी केली आहे. काही दोषींना विशेषाधिकार दिला जात असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. न्या. बी. व्ही. नागरत्न आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली. (Some Convicts More Privileged Than Others SC On 2002 Bilkis Bano Rape Case)

यावेळी या खंडपीठानं म्हटलं, सर्व संबंधित घटक विचारात घेऊन गुजरात सरकारनं माफी देण्याच्या अधिकाराचा योग्य वापर केला की नाही हा सर्वोच्च न्यायालयासमोरचा खरा मुद्दा आहे. खंडपीठानं यावेळी असंही निदर्शनास आणलं की, बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना शिक्षेदरम्यान पॅरोल किंवा फर्लोवर सोडण्यात आलं नाही, अशा जन्मठेपेच्या दोषींशी तुलना होऊ शकत नाही.

दोषींच्या सुटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेविरोधात युक्तिवाद करताना, दोषींपैकी एकाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा म्हणाले, "कारागृहातील जीवन खूप कठीण आहे. त्यांना किमान 15 वर्षे शिक्षा झाली आहे. त्यांची कुटुंबे बाहेर त्यांची वाट पाहत आहेत. अनेक वर्षांपासून ते बाहेर येण्याची आणि सुधारित जीवन जगण्याची वाट पाहत आहेत, सुधारणा हा हक्क आहे."

लुथरा यांच्या युक्तिवादाला उत्तर देताना सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने म्हटलं, "पण, या प्रकरणात त्यांना अनेक दिवस, अनेक वेळा बाहेर येण्याचा विशेषाधिकार मिळाला. हे सर्व असताना ते शांत झाले नाहीत, काही दोषी आहेत ज्यांना अधिक विशेषाधिकार आहे"

पुढे सिद्धार्थ लुथरा म्हणाले, "मी एखाद्या दोषीबद्दल विशिष्ट मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावर खंडपीठ म्हणालं की, "प्रत्येक दोषी सारखा नसतो"

याचिकांमध्ये न्यायालयासमोर कोणीही माफी धोरणाच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही किंवा त्याच्या उद्देशावर शंका घेत नाही. माफी धोरणाच्या अचूकतेवर कोणीही शंका घेत नाहीए. पण प्रश्न हा आहे की या अधिकाराचा वापर आणि हे धोरण कसं लागू करण्यात आलं आहे," असंही खंडपीठानं म्हटलं आहे.

२००२ च्या गुजरात दंगलीत बिल्किस बानोवर पाच महिन्यांची गरोदर असताना सामूहिक बलात्कार झाला होता. तिच्या तीन वर्षांच्या मुलीसह तिच्या कुटुंबातील सदस्यांना ठार करण्यात आलं होता. या भीषण गुन्ह्यातील अकरा दोषींची गेल्या वर्षी गुजरात सरकारनं विशेष अधिकांतर्गत सुटका केली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर या दोषींचं गळ्यात फुलांच्या माळा घालत वाजत गाजत स्वागत करण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT