Sonam Wangchuck Sakal
देश

Sonam Wangchuck : सोनम वांगचूक यांनी २१ दिवसांनंतर सोडले उपोषण! मात्र लढा सुरूच राहिल...

केंद्रशासित लडाखला राज्याचा दर्जा दिला जावा आणि हिमालयातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पाऊले उचलावीत, या मागण्यांसाठी प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचूक यांनी सुरू केलेले आपले उपोषण आज २१ दिवसांनंतर सोडले.

सकाळ वृत्तसेवा

लेह : केंद्रशासित लडाखला राज्याचा दर्जा दिला जावा आणि हिमालयातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पाऊले उचलावीत, या मागण्यांसाठी प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचूक यांनी सुरू केलेले आपले उपोषण आज २१ दिवसांनंतर सोडले. उपोषण सोडले असले तरी लढा सुरूच राहिल, असे वांगचूक यांनी स्पष्ट केले.

हिमालयातील पर्यावरणाच्या संरक्षणाची मागणी करत सोनम वांगचूक यांनी यापूर्वीही उपोषण केले होते. यावेळी त्यांनी लडाखला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याचीही मागणी केली होती. सहा मार्चला उपोषण सुरू करतानाच वांगचूक यांनी, हे उपोषण २१ दिवसांचे असेल, हे स्पष्ट केले होते.

मात्र, हे उपोषण ‘मरेपर्यंत’ लांबवता येईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. लडाख आणि येथील नागरिकांच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी मी माझा लढा सुरूच ठेवणार आहे, असे सांगत वांगचूक यांनी उपोषण सोडले.

या २१ दिवसांत त्यांनी केवळ मीठ आणि पाण्याचे सेवन केले. उपोषण सोडताना लडाखमधील हजारो नागरिक उपोषणस्थळी जमले होते. वांगचूक यांचा लढा आम्ही पुढे सुरू ठेवू, असा निर्धार यावेळी महिलांनी व्यक्त केला. वांगचूक हे शिक्षणतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असून ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील ‘रँचो’ हे पात्र त्यांच्या आयुष्यावरच प्रेरित आहे.

केंद्र सरकारने जनतेच्या भावनांचा विचार करून मागण्या मान्य कराव्यात, असे आवाहन वांगचूक यांनी केले. ‘‘गोठवणारे तापमान असूनही लोक आंदोलन करत आहेत. हिमालयातील वैशिष्ट्यपूर्ण पर्यावरणाचे संरक्षण करणे अत्यंत आवश्‍यक आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे राजकीय नेते म्हणून पाहात नाहीत, तर धोरणकर्ते म्हणून पाहतो आहोत. त्यांनी याचा विचार करून निर्णय घ्यावा,’’ असे आवाहन वांगचूक यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT