Sonia Gandhi sakal
देश

Sonia Gandhi : काँग्रेस संसदीय दलाच्या नेतेपदी सोनिया गांधी,सोनियांचा हल्लाबोल;अनेकांनी आमचे मृत्युलेख लिहिले होते

काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेतेपदी सोनिया गांधी यांची आज एकमताने निवड करण्यात आली. या निवडीनंतर संसदीय दलाच्या बैठकीत बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला केला.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेतेपदी सोनिया गांधी यांची आज एकमताने निवड करण्यात आली. या निवडीनंतर संसदीय दलाच्या बैठकीत बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला केला. काँग्रेस पक्ष अनेक अडथळे आणि संकटे पार करून या निवडणुकीतून बाहेर पडलेला आहे. अनेकांनी आमचे मृत्युलेख लिहिले होते, असा शब्दांत त्यांनी विरोधकांना फटकारले.

लोकसभेतील नवनिर्वाचित खासदार व राज्यसभेतील काँग्रेसचे खासदारांच्या संसदीय दलाची आज बैठक झाली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ९९ खासदार निवडून आले आहेत. संसदीय दलाच्या नेतेपदी सोनिया गांधी यांच्या निवडीला सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘काँग्रेस पुन्हा पुनर्जीवित होत असल्याचे संकेत या निकालाने दिले. हे यश शक्तिशाली यंत्रणेच्या विरोधातील आहे.

जी शक्ती आम्हाला संपविण्यासाठी दबा धरून बसली होती, या शक्तीने काँग्रेस पक्षाची आर्थिक व्यवस्था नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. खोटा दुष्प्रचार करून आमच्या नेत्यांच्या विरोधात एक मोहीम चालविली होती. अनेकांनी आमच्यावर मृत्युलेख लिहून आम्ही संपलो असल्याचा दावा केला होता.’’ यावेळी त्यांनी ‘भारत जोडो यात्रा’ व ‘भारत जोडो न्याय यात्रे’चाही उल्लेख केला.

राहुल यांच्यावर व्यक्तिगत हल्ले झाले तरी ते डगमगले नाहीत. यासाठी त्यांचे विशेष कौतुक केले पाहिजे. या निवडणुकीत त्याने प्रचाराचे मुद्दे निश्चित केले. आता लोकसभेत विरोधकांची संख्या वाढल्याने सरकारला कारभार आपल्या मर्जीने कारभार करता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निश्चयी व ठाम नेतृत्वामुळे या संकटातून बाहेर पडलो. ते आमच्यासाठी एक प्रेरणास्रोत आहेत. त्यांची पक्षाप्रती असलेली निष्ठा वादातीत आहे. त्यांच्यापासून आम्हाला खूप काही शिकता येईल.

- सोनिया गांधी, काँग्रेस नेत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरातशी संबंधित मालमत्ता बड्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नावे, ईडीचा ससेमिरा मागे लागणार; सरकारी बाबूंचे धाबे दणाणले

US-Iran War: ''रात्रीतून सगळं संपेल...'' इराणसोबतच्या बैठकीवरुन अमेरिकेचं मोठं विधान

Chhatrapati Sambhajinagar: भामट्यांनी दोन दिवसांत हिसकावले तिघींचे मंगळसूत्र; सांगा, रात्री घराबाहेर जाणे टाळावे का?

Chhatrapati Sambhajinagar: उभ्या ट्रकला आयशर धडकला; वडोद बाजार फाट्यावरील घटना; चालक गंभीर जखमी

महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा, अकोला जगात सर्वात उष्ण शहर, टॉप १५ मध्ये राज्यातली पाच शहरं

SCROLL FOR NEXT