congress committee meeting sakal media
देश

'मीच पूर्णवेळ अध्यक्ष', सोनिया गांधींनी ‘जी-२३’ नेत्यांना ठणकावले

बैठकीच्या प्रारंभीच सोनिया गांधींनी असंतुष्ट नेत्यांना लक्ष्य करताना आपल्याशी प्रसारमाध्यमांद्वारे बोलण्याची गरज नाही अशा शब्दांत फटकारले.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेसमधील असंतुष्ट ज्येष्ठांचा समूह असलेल्या ‘जी-२३’ ने पक्ष नेतृत्वालाच घेतलेल्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर आज पार पडलेल्या कार्यकारिणीच्या निर्णायक बैठकीत नेतृत्वाचा मुद्दा निकाली काढण्याचा प्रयत्न झाला. खुद्द सोनिया गांधी यांनीच आपण हंगामी नव्हे तर पूर्णवेळ अध्यक्ष असल्याचे ठणकावून सांगतानाच राहुल गांधी यांचाही बचाव केला. आपण पक्षाचे पूर्णवेळ अध्यक्ष असून आपल्याशी माध्यमांद्वारे बोलण्याची गरज नसल्याचे त्यांनी असंतुष्टांना सुनावले. दुसरीकडे, राहुल गांधींनी आताच पक्षाध्यक्षपद स्वीकारावे असा आग्रह ज्येष्ठ नेत्यांकडून धरण्यात आला यावर आपण विचार करू असे आश्वासन देऊन राहुल यांनी पुन्हा नेतृत्व स्वीकारण्याचेही संकेत दिले आहेत.

दरम्यान, संघटनात्मक निवडणुकीच्या वेळापत्रकालाही आज मान्यता देण्यात आली. यानुसार काँग्रेसला पुढील वर्षी ऑगस्टमध्ये नवा अध्यक्ष मिळेल. आजची कार्यकारिणीची बैठक वादळी ठरण्याची शक्यता वर्तविली जात होती. सकाळी दहाला सुरू झालेली ही बैठक दुपारी दोनपर्यंत चालली. तब्बल चार तास चाललेल्या या बैठकीत ४५ सदस्य बोलले. संघटनात्मक निवडणुकीसह आगामी पाच राज्यांच्या निवडणुका आणि विद्यमान राजकीय मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. काँग्रेसची सद्यःस्थिती आणि नेतृत्वाची निष्क्रियता यावर बोलणाऱ्या ‘जी-२३’ गटाच्या नेत्यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत मात्र मवाळ पवित्रा घेत सोनिया गांधींच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. पक्षाध्यक्षपदी राहुल गांधींच्या फेरनिवडीबाबतच्या मुद्द्यावरही हा गट कार्यकारिणीमध्ये पूर्णपणे मौनात राहिला. मात्र, पक्ष सोडून जाणाऱ्यांचे किमान म्हणणे तरी ऐका, असे या गटाकडून नेतृत्वाला सांगण्यात आल्याचे कळते.

सोनियांनी फटकारले

बैठकीच्या प्रारंभीच सोनिया गांधींनी असंतुष्ट नेत्यांना लक्ष्य करताना आपल्याशी प्रसारमाध्यमांद्वारे बोलण्याची गरज नाही अशा शब्दांत फटकारले. पक्षाच्या कार्यकारिणीनेच २०१९ मध्ये आपल्याकडे हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती. त्यानंतर ३० जून २०२१ पर्यंत संघटनात्मक निवडणुकीचे वेळापत्रक ठरविले होते. परंतु कोरोना संसर्गामुळे पक्षांतर्गत निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत,अशी आठवण सोनिया गांधींनी करून दिली. सोबतच आपण पूर्णवेळ आणि सक्रिय अध्यक्ष असल्याचे ठणकावतानाच त्यांनी मागील दोन वर्षांत तरुण नेत्यांनी आक्रमकपणे पक्षाचे धोरण पुढे नेले, असे सूचक प्रशस्तिपत्रही दिले. जनहिताच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण समविचारी राजकीय पक्षांच्या संपर्कात असल्याचा निर्वाळाही त्यांच्याकडून देण्यात आला.

राहुल यांनी वेळ मागितला

या बैठकीमध्ये राहुल गांधींनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे असे आवाहन ए. के. अँटनी यांनी केले. एवढेच नव्हे तर आजपासूनच अध्यक्षपदाची सूत्रे राहुल यांनी हाती घ्यावी अशी सूचनाही त्यांनीच केली होती तर यावर विचार करण्यासाठी वेळ द्यावा, असे राहुल गांधी म्हणाले. मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला घाबरण्याची गरज नाही. हा विचारसरणीचा लढा असून विचारसरणीच्या मुद्द्यावर पक्षाची आणि नेत्यांची भूमिका स्पष्ट असायला हवी असेही ते म्हणाल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT