Piezo electric molecular crystals Sakal
देश

अंतराळयानातील बिघाड आपोआप दुरूस्त होणार

अंतराळयानातील नादुरुस्त झालेल्या विद्युत उपकरणांची दुरुस्ती आपोआप होणे नजीकच्या भविष्यात शक्य होणार आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - अंतराळयानातील (Spacecraft) नादुरुस्त झालेल्या विद्युत उपकरणांची दुरुस्ती (Repairing) आपोआप होणे नजीकच्या भविष्यात (Future) शक्य होणार आहे. नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक भाग (Electronic Parts) आपणहून दुरुस्त होतील, असा पदार्थ भारतीय शास्त्रज्ञांनी (Indian Scientist) विकसित केला आहे. हा पदार्थ त्याच्या‌मधील यांत्रिक दुरुस्त्या या यांत्रिक परिणामाने उत्पन्न होणाऱ्या विद्युत प्रभारांच्या मदतीने स्वतःहून करू शकेल. (Spacecraft Malfunction will be Repaired Automatically)

कोलकाता येथील आयसर संस्थेने, आयआयटी खडगपुरच्या मदतीने पायझो-इलेक्ट्रिक रेण्वीय स्फटिक विकसित केले आहेत. हे स्फटिक बाह्य मदतीशिवाय स्वतःहून स्वतःच्या यांत्रिक दुरुस्त्या करू शकेल. पायझो इलेक्ट्रिक स्फटिक हे त्यांच्यात यांत्रिक बदल झाल्यास विद्युत प्रभार निर्माण करू शकतात.या घन पदार्थांमध्ये यांत्रिक बदल झाल्यास त्यात विद्युत प्रभार उत्पन्न करण्याचा आगळावेगळा गुणविशेष असल्यामुळें उपकरणाचे तुटलेले भाग, भेगा या ठिकाणी विद्युत प्रभार उत्पन्न होऊन ते उपकरण आपणहून दुरुस्त होऊ शकेल.

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने स्वर्णजयंती फेलोशिपच्या माध्यमातून प्रोफेसर सी. एम. रेड्डी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधन मंडळाला या संशोधनासाठी सहाय्य केले आहे. ही पद्धत प्रारंभी प्रा. सी. मल्ला रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता येथील ‘आयसर’मधील संशोधकांनी विकासित केली. रेड्डी हे विज्ञान आणि तंत्रज्ञान कार्यालयाकडून कडून मिळणाऱ्या स्वर्णजयंती फेलोशिपचे वर्ष २०१५ मधील मानकरी आहेत. आयसरमधील निर्माल्य घोष यांना २०२१मध्ये ऑप्टिकल पोलरायझेशनसाठी सोसायटी ऑफ फोटो ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर या संस्थेचे सी. जी. स्टोक्स पारितोषिक मिळाले आहे.

पायझो इलेक्ट्रिक ऑर्गेनिक स्फटिकांच्या अचूकतेच्या मोजमापासाठी त्यांनी अत्याधुनिक पोलारायझेशन मायक्रोस्कोपिक पद्धत वापरली आहे. आयआयटी खरागपुर येथील प्रा. भानू भूषण आणि डॉ. सुमंत करण यांनी शेतीसाठी वापरले जाणारे उपकरणांची यांत्रिक जोडणी करून या नवीन पदार्थाची कामगिरी तपासली आहे.

मानवी हस्तक्षेप अशक्य

अनेक उपकरणे यांत्रिक नादुरुस्तीमुळे बरेचदा बंद पडतात ‌ अशा उपकरणांच्या दुरुस्तीची किंवा ते बदलण्याची गरज आपल्याला भासते. त्यामुळे ती उपकरणे ज्याचा भाग आहे त्या वस्तूचे आयुष्य कमी होते व त्याचा देखभाल खर्चही वाढतो. अंतराळ यानासारख्या अनेक ठिकाणी दुरुस्तीसाठी मानवी हस्तक्षेप शक्य नसतो. ही गरज लक्षात घेता हा पदार्थ उपयुक्त ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Website: मराठी डिजिटल बातम्यांमध्ये 'सकाळ डिजिटल' नंबर १; साडे सहा कोटींहून अधिक वाचकांचा विश्वास

Hapus Mango Price Rise : हवामानामुळे 'फळांचा राजा' महागला; उत्पादनात 30 टक्क्यांनी घट, भावात 25 टक्क्यांची वाढ

Maharashtra Council Election : काँग्रेस विधानपरिषदेसाठी उमेदवार देणार नाही, अंबादास दानवेंचा मार्ग मोकळा; निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

IPL 2026: रियान परागला BCCI ने सुनावली शिक्षा! ड्रेसिंग रुममध्ये व्हॅपिंग करणं पडलं महागात

एकुलत्या एक मुलाच्या निधनानंतर आईने सोडलं ८० कोटींच्या बंगल्यावर पाणी, झोपडीत काढतेय अखेरचे दिवस

SCROLL FOR NEXT