Mansukh Mandviya 
देश

Sputnik Light Vaccine : भारतात आणीबाणीच्या वापरासाठी परवानगी

सकाळ डिजिटल टीम

भारताचे ड्रग्ज कंट्रोलर जनरलने (DCGI) भारतात सिंगल-डोस स्पुतनिक लाइट कोविड-१९ लसीला (Sputnik Light Vaccine) आणीबाणीच्या वापराची परवानगी दिली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ट्विटद्वारे सांगितले. ही देशातील 9वी कोरोना लस असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. यामुळे साथीच्या रोगाविरुद्ध देशाचा एकत्रित लढा आणखी मजबूत होईल, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

रशियाने स्पुतनिक लाइट (sputnik light) ही लस केली आहे. ही लस ७९.४ टक्के इतकी प्रभावी आहे. स्पुतनिक व्ही लसीच्या पुढची ही स्पुतनिक लाइट लस (sputnik light vaccine) आहे. युरोप आणि अमेरिका वगळता जगातील ६० देशांनी स्पुतनिक व्ही लसीच्या वापराला परवानगी दिली आहे. कोरोनाविरुद्ध (coronavirus) लढण्यासाठी भारतातही स्पुतनिक व्ही लसीला मंजुरी देण्यात आली आहे. आता स्पुतनिक लाइट या लसीलाही भारतात आणीबाणीच्या काळात वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.

स्पुतनिक लाइट (Sputnik Light Vaccine) ही लस मॉस्कोतील गमलेया रिसर्च इन्स्टिट्यूटने तयार केली आहे. स्पुतनिक व्ही प्रमाणेच स्पुतनिक लाइट लसीलाही रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने (RDFI) आर्थिक पाठबळ दिले आहे. ही लस सिंगल डोस लस आहे. रशियाचा दावा आहे की स्पुतनिक लाइट पहिल्या तीन महिन्यांत कोरोनाच्या डेल्टा प्रकाराविरुद्ध ७० टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे.

भारताचे ड्रग्ज कंट्रोलर जनरलने भारतात सिंगल-डोस स्पुतनिक लाइट कोविड-१९ लसीला (Sputnik Light Vaccine) आणीबाणीच्या वापराची परवानगी दिल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ट्विटद्वारे सांगितले. या निर्णयामुळे साथीच्या रोगाविरुद्ध देशाचा एकत्रित लढा आणखी मजबूत होईल, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artemis 2 mission: ऐतिहासिक क्षण! ५० वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्राकडे; मानवाच्या इतिहासातील सर्वात दूरचा अंतराळ प्रवास

Divyang Students: राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय! दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ; अभ्यास दौऱ्यासाठी मिळणार अर्थसाह्य..

Latest Marathi News Live Update : नागपुरात हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा; रात्री जोरदार पावसाची हजेरी

Chhatrapati Sambhajinagar: अजिंठा घाटात ट्रक अपघात, वाहतूक सुमारे एक तास ठप्प; पंढरपूर-जळगाव ट्रकचा ब्रेक फेल; समोरील ट्रकला धडक

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

SCROLL FOR NEXT