file photo
file photo 
देश

काश्‍मीरमध्ये हिमस्खलनामुळे पाच जवान बेपत्ता

वृत्तसंस्था

श्रीनगर: जम्मू-काश्‍मीरमध्ये हिमस्खलनामुळे ताबा रेषेवरील गुरेझ आणि विभागातील लष्करी ठाण्यात तैनात पाच जवान बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे लष्करी अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.

जम्मू- काश्‍मीरमध्ये सोमवारपासून (ता.10) प्रचंड प्रमाणात हिमवृष्टी व मुसळधार पाऊस सुरू आहे. कूपवाडा जिल्ह्यातील नौगाम विभागात दोन जवान निसरड्या उतारावरून पडले. बंदिपुरा जिल्ह्यातील गुरेझमधील कझंलवान उपविभागातील ठाण्यातील तीन जवान हिमस्खलनात बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी आज दिली. बेपत्ता जवानांचा शोध घेण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. गुरेझमधील तुलाई येथे हिमस्खलनात अडकल्याने लष्कराचा हमाल कालपासून बेपत्ता झाला आहे.

दरम्यान, सीमारेषेवरील गुरेझ भागातील बकतूर येथील लष्काराचे ठाणे हिमस्खलनात उद्‌ध्वस्त होऊन तीन जवान बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांनी या पूर्वी दिली होती. याच वर्षी जानेवारी महिन्यात गुरेझमध्ये हिमवादळात दहा जवान आणि चार सामान्य नागरिक मृत्युमुखी पडले होते.

राष्ट्रीय महामार्ग बंद
हिमवर्षाव आणि मुसळधार पावसामुळे मंगळवारी जम्मू-काश्‍मीर राष्ट्रीय महामार्ग आणि मुघल रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच कमी दृश्‍यमानतेमुळे श्रीनगर विमानतळावरील विमानसेवा थांबविण्यात आली असल्याने काश्‍मीर खोऱ्याचा देशाची संपर्क तुटला आहे. राज्यात हवामानाची अशी स्थिती गुरुवारपर्यंत (ता.14) राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. बनिहाल विभागात हिमवर्षाव व अन्य भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने जम्मू-काश्‍मीर महामार्ग बंद करावा लागला, अशी माहिती वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
गुलमर्गमध्ये राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद आज झाली. तेथे उणे 6.5 अंश सेल्सिअस तापमान होते. येथे चार फुटांपर्यंत बर्फ साठले आहे. उत्तराखंडमध्येही हिमवर्षावामुळे एक ते दोन फूट बर्फ साठला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT