Srinivasa Ramanujan
Srinivasa Ramanujan sakal
देश

Srinivasa Ramanujan : वयाच्या ३२ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, महान गणितज्ञ रामानुजनांची गणितासोबतची अनोखी लव्हस्टोरी

सकाळ डिजिटल टीम

Srinivasa Ramanujan : भारताचे सर्वात मोठे गणितज्ञ म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास रामानुजन यांचा आज स्मृतिदिन. फक्त ३२ वर्षाचे असताना त्यांनी जगाचा निरोप घेतला. रामानुजन खूप कमी आयुष्य जगले पण जितके वर्ष जगले, ते सर्व वर्षे लाखमोलाचे होते.

11 दिसंबर, 1887 ला तमिळनाडूच्या कोयंबटूर जवळील एका गावात इरोडमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांना गणित प्रचंड आवडायचं. घराच्या भिंती, दरवाजे एवढंच काय तर शाळेचे प्रत्येक ब्लॅक बोर्डवर रामानुजन नेहमी गणित सोडवायचे. ते विज्ञान, इतिहास, इंग्रजी किंवा भूगोलच्या क्लासमध्ये सुद्धा गणिताचा अभ्यास करायचे. ते गणिताचा एवढा अभ्यास करायचे की गणित सोडून ते इतर सर्व विषयांमध्ये फेल व्हायचे.

रामानुजन यांच्या आयुष्यात संघर्ष कायम राहला. पाच रुपयांच्या महिन्यात ते गणिताचे ट्यूशन घेत आपला खर्च भागवायचे. त्याच दरम्यान त्यांचा विवाह झाला. नोकरी करायची होती पण त्यांना बारावी पास नसल्यामुळे नोकरी मिळाली नाही.

रामानुजन यांचे आयुष्य बदलण्यात एका व्यक्तींचा मोलाचा वाटा आहे. कुंभकोणमचे डिप्टी कलेक्टर श्री वी. रामास्वामी अय्यर हेच ते व्यक्ती जे स्वत: गणितज्ञ होते. त्यांनी रामानुजन यांना ओळखले आणि त्यांच्यासाठी २५ रुपये स्कॉलरशिप बांधली. त्यांनी त्याच पैशात पहिला रिसर्च पेपर वाचला.

हा तोच रिसर्च पेपर होता जो लंडनच्या कैंब्रिजच्या प्रोफेसरनी वाचला होता. हा रिसर्च पेपरच पुढे रामानुजन यांना कैंब्रिजला जाण्यासाठी एक मार्ग ठरला.

रामानुजनच्या जीवन कहानीत प्रो. हार्डी यांचे मोलाचे योगदान आहे. हार्डी यांच्याशिवाय रामानुजन यांची कहानी अशक्य आहे. हार्डीने लंडनला असूनही भारतात एका छोट्या गावात असणाऱ्या गणित सोडवणाऱ्या जिनियसला ओळखले होते.

हार्डी आणि रामानुजन यांच्यात पत्रव्यव्हार व्हायचा. ते एकमेकांना गणितचे समीकरण पाठवायचे. रामानुजन कठीण असणारे गणित सोप्या पद्धतीने कसे सोडवतात, याचं नेहमी हार्डी यांना आश्चर्य वाटायचं. हार्डी यांच्या आर्थिक मदतीमुळे रामानुजन कैंब्रिजला आले.

जग रामानुजनला ओळखू लागले. रामानुजन फक्त 33 वर्षाचे होते जेव्हा त्यांनी अखेरचा श्वास घेतला पण एक महान गणितज्ञ म्हणून ते आजही जगप्रसिद्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT