Kalkaji Temple Stampede Esakal
देश

Kalkaji Temple Stampede: कालकाजी मंदिरात जागरणा दरम्यान कोसळला स्टेज, चेंगराचेंगरीत १७ जण जखमी, एका महिलेचा मृत्यू, VIDEO

Delhi Kalkaji Temple Stampede: दिल्लीच्या कालकाजी मंदिरात जागरण सुरू असताना स्टेज कोसळून सुमारे १७ जण जखमी झाले आणि एका 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रात्री साडे बाराच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

दिल्लीच्या कालकाजी मंदिरात जागरण सुरू असतानाच अचानक स्टेज कोसळून सुमारे १७ जण जखमी झाले आणि एका 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रात्री साडे बाराच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी आयोजकांविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जानेवारी रोजी कालकाजी मंदिरात माता का जागरणाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये रात्री 12.30 च्या सुमारास 1500 ते 1600 लोकांची गर्दी जमली होती. दरम्यान, जमाव आयोजक आणि व्हीआयपींच्या कुटुंबीयांसाठी बनवलेल्या स्टेजवर चढला, त्यानंतर स्टेज खाली कोसळला. या अपघातात स्टेजखाली बसलेले 17 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेत एका महिलेचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी अपघातात जखमी झालेल्या ४५ वर्षीय महिलेला ऑटोमधून मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मात्र, अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही.

गायक बी प्राक याला पाहण्यासाठी झाली होती गर्दी

या जागरणमध्ये प्रसिद्ध बॉलिवूड गायक बी प्राक पोहोचला होता, त्याला पाहण्यासाठी गर्दी जमली होती. दरम्यान, मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाली.

कार्यक्रमाच्या आयोजनाला परवानगी नव्हती : पोलीस

हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती, असेही पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पोलिसांनी आयोजकांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३३७/३०४ अ/१८८ अन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station Expansion : पुणेकरांसाठी गूड न्यूज! रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट; 400 कोटींचा मेगा प्लॅन तयार, आता 'या' मार्गाने मिळणार एन्ट्री

समृद्धी महामार्गावर दुचाकींचा धोकादायक सुसाट प्रवास; प्रवेशबंदी धाब्यावर, व्हिडिओ व्हायरल

Bullock Cart Race Accident : बैलांच्या पायात अडकला तरुण, बैलगाडीखाली चिरडले जाताना सुदैवाने बचावले; शर्यतीत दुचाकीस्वारांचा थरकाप उडवणारा अपघात

कथानकातील ढिसाळपणा पडला भारी ! ठरलं तर मगचा टीआरपी घसरला, स्टार प्रवाहची 'ही' मालिका ठरली गेमचेंजर

Horoscope : उद्या बनतोय संकष्टी लाभ योग! पुढचे तीन दिवस 'या' 3 राशींसाठी गोल्डन टाइम; पैशाची अडचण होईल दूर, अडकलेल्या कामांची पूर्ती

SCROLL FOR NEXT