Viral Video 
देश

Viral Video: विद्यार्थ्यानं परीक्षेत उत्तरांऐवजी लिहिलं गाणं! शिक्षकानं केली खास टिप्पणी, एकदा पाहाच

सोशल मीडियात पेपरचा आणि शिक्षकाच्या टिप्पणीचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम, Anish

नवी दिल्ली : परीक्षेदरम्यान प्रत्यक्ष पेपर लिहिताना आपली सर्वांची अवस्था काय असते हे सर्वांना माहितीच आहे. यावेळी काही अवघड प्रश्न समोर आल्यानंतर तर आपल्या मनात उत्तरांऐवजी काही कॉमन गाणीच येतात. असाच काहीसा एक प्रकार नुकताच समोर आला आहे. या विद्यार्थ्यानं बॉलिवूडमधील गण्यांच्या काही ओळीच चक्क उत्तर पत्रिकेत लिहिल्या. विशेष म्हणजे या विद्यार्थ्याचा पेपर शिक्षकानं तपासल्यानंतर त्यावर खास टिप्पणी देखील केली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. (Student writes lyrics of Bollywood songs in answer sheet Dont miss teachers remark)

चंदीगड युनिव्हर्सिटी मिम्स नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या शॉर्ट क्लीपमध्ये विद्यार्थ्याला पेपरमध्ये मोठा भोपळा मिळालेला आहे. यामध्ये संबंधित विद्यार्थ्यानं तीन प्रश्नांची उत्तर दिली असून यामध्ये त्यानं प्रसिद्ध गाण्यांच्या ओळी लिहिल्या आहेत. यामध्ये थ्री इडियट्स या सिनेमातील 'गिव्ह मी सम सन शाइन' आणि पीके सिनेमातील 'भगवान है कहा रे तू' या गाण्यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे शिक्षकानं त्याची ही उत्तर पत्रिका पूर्ण तपासली असून प्रश्नांसाठी गाणी उत्तरांत लिहिल्यानं त्याला मोठा भोपळाही शिक्षकानं दिला आहे. पण सर्वांत मजेशीर बाब म्हणजे या पेपर तपासणाऱ्या शिक्षकानं शेवटच्या पानावर संबंधित विद्यार्थ्यासाठी एक संदेशही लिहिला आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं की, तू आणखी उत्तर लिहायला हवी होती. इथं उत्तर म्हणजे अर्थात गाणी.

ज्या इन्स्टापेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडिओला ४ लाख व्हूव्ज मिळाले आहेत. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये युजर्सनं अनेक भन्नाट आणि मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. हा सर्व प्रकारच मुळात खूपच मजेशीर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Water Scarcity : अंबड तालुक्यात पाणी टंचाईचे सावट: लघु,पाझर तलाव कोरडेठाक तर विहिरी, कूपनलिका ची पाणी पातळी चालली खालावत

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT