womans suicide
womans suicide womans suicide
देश

‘विवाहिताप्रमाणे अंत्यसंस्कार करू नका’ हातावर सुसाइट नोट लिहून आत्महत्या

सकाळ डिजिटल टीम

‘सासऱ्यांच्या टोमणेने मी हैराण झाली आहे. माझ्यावर अंत्यसंस्कार माझ्या लहानपणाच्या गावातच करा. विवाहिताप्रमाणे माझ्यावर अंत्यसंस्कार करू नका. विवाहितेचे प्रतीक असलेल्या प्रत्येक वस्तू अंत्यसंस्कारापासून दूर ठेवा’ अशी पाच पानी सुसाईट नोट (Suicide note) लिहून २५ वर्षीय विवाहितेने आत्महत्या (womans suicide) केली. ही घटना हरियाणाची सायबर सिटी गुडगावच्या कार्टरपुरी गावात घडली.

रितूचा भाऊ कुलदीपने सांगितले की, १८ फेब्रुवारीला रितूचे लग्न दिल्लीतील दरियापूर खुर्द येथील चेतनसोबत झाले होते. बहिणीला एमबीए केल्यानंतर नोकरी करायची होती. परंतु, सासरच्या मंडळींना ते आवडत नव्हते. बहिणीचा नवरा चेतन, जेठ कुलदीप, जेठानी शोभा आणि सासू रमेश देवी हे हुंड्यासाठी छळ करीत होते. यामुळे तिला आत्महत्या करावी लागली.

रितूचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. लग्नात आम्ही आमच्या अयपतीपेक्षा जास्त हुंडा दिला होता. तरीही छोट्या छोट्या गोष्टींवरून सासरचे लोक तिला हुंड्यासाठी त्रास देत होते. रितूला समजावून सांगायचो की काही दिवसांनी सर्व काही ठीक होईल. परंतु, सासरच्या टोमण्यांना कंटाळून ती आत्महत्या करेल याचा विचार आम्ही केला नव्हता, असे रितूच्या नातेवाइकांनी सांगितले.

हातावर पण लिहिली नोट

रितूने आत्महत्या करण्यापूर्वी हातावर सुसाईड नोट (Suicide note) लिहिली होती. आत्महत्येसाठी (womans suicide) तिने सासरच्या मंडळींना जबाबदार धरले आहे. सुसाईड नोटमध्ये तिने ‘सासरच्या लोकांनी माझे तोंडही पाहू नये’ अशी शेवटची इच्छा लिहिली आहे. कुलदीपच्या तक्रारीवरून गुरुग्रामच्या पालम विहार पोलिस ठाण्यामध्ये सासरच्या लोकांविरुद्ध हुंड्यासाठी छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT