Suicide of students due to defamation Coaching Hub 14 students Suicide case jee neet exam esakal
देश

Crime News : अपयशाच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

‘कोचिंग हब’ कोटातील चित्र; वर्षभरात १४ विद्यार्थ्यांनी संपविले जीवन

सकाळ वृत्तसेवा

कोटा : राजस्थानमधील कोटा शहरात दरवर्षी देशभरातून लाखो विद्यार्थी ‘नीट’, ‘जेईई’ उत्तीर्ण होऊन देशातील प्रतिष्ठित महाविद्यालयांत प्रवेश मिळविण्याचे स्वप्न घेऊन दाखल होतात. मात्र, अत्यंत व्यग्र दिनक्रम, मित्रमैत्रिणींचा दबाव, अपेक्षांचे ओझे आदींखाली ते दबून जातात. अपयशाच्या भीतीमुळे नव्हे तर अपमान, मानहानी होण्याच्या भीतीने काही विद्यार्थी थेट आयुष्यच संपविण्याचे टोकाचे पाऊल उचलत आहेत. कोटातील विविध कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या १४ विद्यार्थ्यांनी यावर्षी आत्महत्या केली. लॉकडाउनमुळे २०२१ मध्ये एकाही विद्यार्थ्याच्या आत्महत्येची नोंद नाही. नुकतेच तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ॲलेन करिअर इन्स्टिट्यूटचे मुख्य मानसशास्त्रज्ञ डॉ. हरीश शर्मा म्हणाले, की विद्यार्थ्यांना अभ्यासापेक्षाही भावनिक ताण हाताळणे अवघड जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये भावनिक ताण हा शैक्षणिक ताणापेक्षा खूपच अधिक आहे. त्याचप्रमाणे, विद्यार्थ्यांना परीक्षेत नापास होण्याचीही भीती वाटत नाही. मात्र, अपयशानंतर होणाऱ्या अपमान, मानहानीच्या भीतीमुळे ते आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलत आहेत. इतरांच्या अपेक्षांचे ओझे स्वत:च्या अपेक्षांशी जोडले गेल्याने अनेकदा विद्यार्थ्यांची निराशा होते. २०२२ मध्येही पालकत्वाची शैली १९७० प्रमाणेच आहे. दिवसभर सतत क्लास, चाचण्या, इतरांना मागे टाकत अभ्यासक्रमाची गती कायम राखण्याचा प्रयत्न असा कोटातील विद्यार्थ्यांना व्यग्र दिनक्रम असतो. त्यातून तणावमुक्त होण्यासाठी ते वेबसिरीज पाहतात.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमध्ये कोचिंग क्लासची भूमिका असल्याचे वाटत नाही. ‘जेईई’, ‘नीट’ या खूप अवघड परीक्षा आहेत, हे आपण मान्य करायला हवे. पालकांनी विद्यार्थ्यांवर डॉक्टर, इंजिनिअर होण्याचा दबाव टाकण्यापेक्षा विद्यार्थ्यांची क्षमता ओळखण्यासाठी अभियोग्यता चाचणी करावी. त्यानुसार करिअरची निवड करावी.

-डॉ. चंद्रशेखर सुशील, मानसशास्त्रज्ञ, कोटा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: अतिवृष्टीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला फटका

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT