Sumitra Mahajan
Sumitra Mahajan 
देश

एटीएस प्रमुख म्हणून हेमंत करकरेंची भूमिका संशयास्पद : सुमित्रा महाजन 

वृत्तसंस्था

भोपाळ : लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी हुतात्मा हेमंत करकरेंच्या एटीएस (दहशतवाद विरोधी पथक) प्रमुख भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले आहे, की कर्तव्य बजावताना करकरे हुतात्मा झाले. पण, एटीएस प्रमुख म्हणून त्यांची भूमिका संशयास्पद होती. 

भोपाळमधील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा हेमंत करकरेंबद्दल केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला असताना आता सुमित्रा महाजन यांनी हे वक्तव्य केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी करेकरेंची भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. सुमित्रा महाजन या इंदुर लोकसभा मतदारसंघातून 8 वेळा खासदार राहिल्या आहेत. तसेच त्यांनी दिग्विजय सिंह आणि हेमंत करकरे यांचे संबंध चांगले होते असेही म्हटले आहे.

महाजन म्हणाल्या, का दिग्विजयसिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सतत बॉम्ब बनवत असल्याचे आरोप केले होते. शिवाय, त्यांच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र एटीएसने काही जणांना इंदूरमधून अटक केली होती. मुंबई हल्ल्यात करकरेंचा मृत्यू झाल्याने त्यांना हुतात्मा मानले जात आहे. 

याविषयी दिग्विजयसिंह यांनी ट्विट करत म्हटले आहे, की सुमित्राताई तुम्ही मला अशोकचक्र विजेते हेमंत करकरे यांच्याशी जोडत असल्याने गर्व आहे. तुमच्या जोडीदाराने भले त्यांचा अपमान केला असेल, पण मी कायम देशहित, राष्ट्रीय एकता आणि अखंडतेसाठी काम करणाऱ्यांसोबत असेल. मी मुख्यमंत्री असताना सिमी आणि बजरंग दलावर बंदी घालण्याची शिफारस केली होती. माझ्यासाठी देशच सर्वकाही आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT