राजधानीची घुसमट : आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी
राजधानीची घुसमट : आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी sakal media
देश

राजधानीची घुसमट : आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘‘ राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणाला पायबंद घालण्यासाठी हवेच्या गुणवत्तेबाबत स्थापन करण्यात आलेल्या आयोगाने केलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात यावी.’’ असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली राज्य सरकारला दिले आहेत. आम्ही शाळा बंद करण्यास सांगितल्याने माध्यमातील एका गटाने आमची प्रतिमा खलनायक अशी रंगविली असल्याची खंत देखील न्यायालयाने व्यक्त केली. सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांच्या अध्यक्षतेखालील विशेष खंडपीठासमोर आज याप्रकरणी सुनावणी पार पडली. राजधानी दिल्लीचा परिसर आणि लगतच्या भागातील हवेच्या गुणवत्तेच्या व्यवस्थापनाबाबत आयोगाने सादर उपाययोजनांची न्यायालयाने गंभीर दखल घेतली. केंद्र आणि दिल्ली सरकारने या निर्देशांचे पालन करणे गरजेचे आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

आयोगाने सादर केलेल्या शपथपत्रामध्ये म्हटले आहे की,‘‘ दिल्ली आणि लगतच्या परिसरातील प्रदूषण रोखण्यासाठी पाच सदस्यांचे कृती पथक स्थापन करण्यात आले असून आम्ही सुचविलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी चौदा आणखी पथके स्थापन करण्यात आली आहेत. सतरा भरारी पथकेही स्थापन करण्यात असून येत्या चोवीस तासांमध्ये त्यांची संख्या ही चाळीसपर्यंत वाढविण्यात येईल.

यूपी सरकारला सुनावले

आजच्या न्यायालयातील सुनावणीदरम्यान उत्तरप्रदेश सरकार तोंडघशी पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. पाकिस्तानातून येणाऱ्या हवेमुळे राजधानीत प्रदूषण होत असल्याचा दावा यूपी सरकारचे वकील रणजीतकुमार यांनी केला. राज्यातील प्रदूषित हवा ही खालच्या दिशेने जाते त्यामुळे राजधानीतील प्रदूषण हे आमच्यामुळे होत नसल्याचे कुमार यांनी नमूद केले. यावर सरन्यायाधीश रमणा यांनी आता तुम्ही पाकिस्तानातील उद्योगांवर बंदी घालणार आहात काय? अशी थेट विचारणा केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

ICC Ranking: वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने भारताकडून हिसकावलं कसोटीचं सिंहासन; पण वनडे - टी20 मध्ये रोहितसेनाच अव्वल

Dharmendra And Hema Malini: 44 वर्षानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी पुन्हा केलं लग्न? रोमँटिक फोटो व्हायरल

Planet Nine : नेपच्यूनच्या पलीकडे असू शकतो आणखी एक ग्रह; आतापर्यंत राहिला होता लपून.. शास्त्रज्ञांना मिळाले नवे पुरावे!

SCROLL FOR NEXT