Dharmendra And Hema Malini: 44 वर्षानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी पुन्हा केलं लग्न? रोमँटिक फोटो व्हायरल

Dharmendra And Hema Malini: धर्मेंद्र आणि हेमा यांनी पुन्हा लग्न केलंय का? असा प्रश्न आता त्यांचे फोटो पाहून नेटकऱ्यांना पडला आहे.
44 वर्षानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी पुन्हा केलं लग्न? रोमँटिक फोटो व्हायरल
Dharmendra And Hema MaliniESAKAL

Dharmendra And Hema Malini: बॉलिवूडची आयकॉनिक जोडी अशी अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) आणि अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांची ओळख आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाला 44 वर्ष झाली आहेत. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी त्यांच्या लग्नाच्या 44 व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं आहे. त्यांच्या या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोंमध्ये दिसत आहे की, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या गळ्यात फुलांचे हार घातले आहेत. धर्मेंद्र आणि हेमा यांनी पुन्हा लग्न केलंय का? असा प्रश्न आता त्यांचे फोटो पाहून नेटकऱ्यांना पडला आहे.

हेमा मालिनी यांनी शेअर केले फोटो

हेमा मालिनी यांनी त्यांच्या आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहेत. त्यातील एक फोटोमध्ये दोघांनी हार घातलेला दिसत आहे. तर एका फोटोमध्ये धर्मेंद्र हे हेमा मालिनी यांना गालावर किस करताना दिसत आहेत. एका फोटोत ईशा देओल धर्मेंद्र आणि हेमा यांच्यासोबत दिसत आबेत.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची लव्ह स्टोरी

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची पहिली भेट 1970 मध्ये रिलीज झालेल्या तुम हसीन मैं जवान या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. त्यानंतर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण हेमा मालिनी यांचे आई-वडील या लग्नासाठी तयार नव्हते. यानंतर अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर दोघांनी 1980 मध्ये लग्न केले. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना ईशा आणि आहाना या मुली आहेत.

44 वर्षानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी पुन्हा केलं लग्न? रोमँटिक फोटो व्हायरल
Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचे चित्रपट

2020 मध्ये हेमा मालिनींचा शिमला मिर्ची हा चित्रपटात रिलीज झाला होता. तर धर्मेंद्र हे तेरी बातों में ऐसा उल्झा जिया या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता ते इक्किस या चित्रपटात काम करणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखील दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com