NEET Exam Esakal
देश

NEET Exam : ‘नीट’ संदर्भात ८ जुलै रोजी सुनावणी; सरन्यायाधीश २६ याचिका निकाली काढणार

NEET-UG row : गेल्या मे महिन्यात झालेल्या ‘नीट’ परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याचा दावा करणाऱ्या असंख्य याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘नीट’ परीक्षेतील अनियमिततेच्या अनुषंगाने दाखल याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ येत्या ८ जुलै रोजी एकत्रित सुनावणी घेईल. याआधी झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने ‘नीट’ परीक्षा तसेच परीक्षेनंतर घेतले जाणारे समुपदेशन रद्द करण्यास नकार दिला होता.

गेल्या मे महिन्यात झालेल्या ‘नीट’ परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याचा दावा करणाऱ्या असंख्य याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. काही याचिकांमध्ये ही परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याचे निर्देश दिले जावेत अशी विनंती करण्यात आली आहे.

८ जुलै रोजी एकूण २६ याचिकांवर सरन्यायाधीश चंद्रचूड, न्या. मनोज मिश्रा आणि न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. ‘एमबीबीएस’, ‘बीडीएस’, ‘आयुष’ तसेच इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीचे प्रवेश ‘नीट’ परीक्षेतील गुणांच्या आधारे दिले जातात. ५ मे रोजी देशभरातील ४ हजार ७५० केंद्रांवर झालेल्या ‘नीट’ परीक्षेस २४ लाख विद्यार्थी बसले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार परीक्षेचा निकाल १४ जून रोजी जाहीर केला जाणार होता मात्र तत्पूर्वीच ४ जून रोजी हा निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर या परीक्षेत अनियमितता झाल्याचे आणि पेपरफुटीचे दावे करीत सर्वोच्च न्यायालयामध्ये असंख्य याचिका दाखल झाल्या होत्या. दिल्लीसह देशाच्या इतर भागांत विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलनेही केली होती.

राहुल यांचे पंतप्रधानांना पत्र


‘नीट’ परीक्षेसंदर्भातील मुद्यावर लोकसभेत उद्या (ता.३) चर्चा करावी अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. देशातील २४ लाख विद्यार्थ्यांशी या परीक्षेचासंबंध असून विरोधी पक्षांना या देशव्यापी मुद्यावर लोकसभेत चर्चा घडावी यासाठी पाठपुरावा केला आहे. यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांनी ‘नीट’च्या मुद्यावर चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. या मुद्यावर सकारात्मक चर्चा घडावी असा विरोधी पक्षाच्या सदस्यांचा प्रयत्न आहे. गेल्या सात वर्षांत पेपरफुटीच्या ७० घटना घडल्या आहेत. ही परीक्षा आयोजित करणारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) या प्रकारावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

RG Kar Case: दोन वर्षांनंतर आरजी कर प्रकरणाला नवं वळण! पुन्हा चौकशी होणार; शुभेंदू अधिकारी सरकारचा मोठा निर्णय

Pune Nashik Railway: पुणे–नाशिक रेल्वे मंचरमार्गेच व्हावी; अन्यथा तीव्र आंदोलन: रेल्वे कृती समिती आंबेगावचे अध्यक्ष बाबाजी चासकर

SCROLL FOR NEXT