Supreme-Court 
देश

कोरोना पॉलिसीवर सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारलं

कार्तिक पुजारी

सुप्रीम कोर्टाने आज कोरोनासंबंधी मुद्द्यांवर सुनावणी केली. यावेळी कोर्टाने लशींच्या वेगवेगळ्या किंमतीबाबत प्रश्न उपस्थित केले.

नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाने आज कोरोनासंबंधी मुद्द्यांवर सुनावणी केली. यावेळी कोर्टाने लशींच्या वेगवेगळ्या किंमतीबाबत प्रश्न उपस्थित केले. सुप्रीम कोर्ट म्हणालं की, देशात सर्वत्र लशीची एकच किंमत असण्याची आवश्यकता आहे. याशिवाय कोर्टाने कोविड ऍपवरही भाष्य केलं. सर्वांना कोविन ऍपवर नोंदणी बंधनकारण करण्यात आली आहे. पण, अनेक गावात इंटरनेट नसण्याची शक्यता आहे. तेथे लोक कोविन ऍपवर लसीकरणासाठी नोंदणी करु शकतील का? असा प्रश्न केंद्राला विचारला. लशींच्या खरेदीबाबत केंद्र सरकारने प्रयत्न वाढवावेत असंही कोर्टाने म्हटलंय. (Supreme Court criticize Centre On Vaccine Decisions)

सुप्रीम कोर्ट म्हणालं की, सध्याच्या पॉलिसीमधून ग्रामीण भागाला वगळण्यात आलं आहे. त्यामुळे नवी पॉलिसी आणण्याची गरज आहे. नव्या नियमांच्या अभावामुळे संकट वाढू शकते. सरकारने नवी पॉलिसी आणायला हवी, जेणेकरुन काही अडचणी दूर होतील. यामुळे राज्यांनाही मार्गदर्शन मिळेल, असं कोर्टाने म्हटलं आहे.

45 वर्ष वयांवरील नागरिकांसाठी केंद्र सरकार लस खरेदी करत आहे, पण १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी कमी लस पुरवठा होत आहे. लस निर्मिती कंपन्या राज्यांना ५० टक्के लशी देत आहेत. किंमत केंद्र सरकार ठरवतं आणि उर्वरित खासगी रुग्णालयांना दिलं जात आहे. याचा आधार काय आहे? असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला. केंद्राने कोर्टात सांगितलं की, यावर्षीच्या शेवटापर्यंत देशातील सर्व नागरिकांना लस मिळण्याची आशा आहे.

सुप्रीम कोर्टाचे तीन न्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, एलएन राव आणि एस रविंद्र भट यांच्या बँचने सरकारला विचारलं की, तुम्ही सांगत होता की ४५ वर्षांपुढील लोकांमध्ये मृत्यूदर जास्त आहे, पण दुसऱ्या लाटेमध्ये अशा व्यक्तींना कमी धोका आहे. १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींमध्ये जास्त धोका आहे. त्यामुळे लस खरेदी करताना सरकार केवळ ४५ वर्षांपुढील व्यक्तींचाच का विचारत करत आहे?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapuri Jaggery Crisis : कोल्हापुरी गुळाचा ब्रँड धोक्यात? गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर; एका आदणावर शेतकऱ्याला होतोय तब्बल 2 हजार रुपयांचा तोटा

मग काय करणार? गणपती विसर्जनावेळी चक्क साडी नेसून नदीत पोहली मराठमोळी गायिका; Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Ajintha ST Accident: अजिंठ्यात एसटी बसचा थरारक अपघात; ट्रेलरला मागून धडक, २० हून अधिक प्रवासी जखमी

Latest Marathi News Live Update : टीएमसीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा वाद तीन महिन्यात निकाली काढण्याचे निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश

पाणी देता का पाणी? नसेल तर गाव विकायचंय, आम्ही कर्नाटकात जातो; सोलापूर, सांगलीतले गावकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT