Supreme Court टिम ई सकाळ
देश

हिजाब प्रकरणी याचिकेवर तातडीने यादी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याच्या बंदीला आव्हान देणाऱ्या याचिका मोठ्या खंडपीठासमोर पाठवल्या.

सकाळ डिजिटल टीम

हिजाब (Hijab) घालू देण्याच्या मागणीसाठी कर्नाटक उच्च न्यायालयात (High Court of Karnataka) याचिका दाखल करण्यात आली होती. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या (Karnataka High court) एकल खंडपीठाने महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याच्या बंदीला आव्हान देणाऱ्या याचिका मोठ्या खंडपीठासमोर पाठवल्या. यावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) दाखल करण्यात आलेल्या याचिकांची तातडीने यादी करण्यास नकार दिलाय.

कर्नाटकातील (Karnataka) उडुपी जिल्ह्यातील एका महाविद्यालयात मुस्लिम मुलीनी हिजाब (Hijab) घालू देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. हिजाब परीधान करून वर्गात प्रवेश दिला जात नसल्याचा आरोप या मुस्लीम विद्यार्थिनींनी केला होता त्यानंतर हा वाद चांगलाच चिघळला.

या प्रकरणावर काही दिवसापुर्वी कर्नाटकचे शिक्षणमंत्री बीसी नागेश (BC Nagesh) यांनी प्रतिक्रिया दिली होती. शाळा आणि महाविद्यालये धर्म पाळण्याची जागा नाही. हिजाब घालणे हे अनुशासनहीनता असल्याचे बी.सी. नागेश यांनी सांगितले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी या मुद्दयावरून राजकारण करण्याचा हा प्रकार असल्याचेही बीसी नागेश यांनी बोलून दाखवले होते तर मुस्लिम विद्यार्थिनींनी मात्र याचा राजकारणाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

आजचे राशिभविष्य - 17 सप्टेंबर 2026

Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

SCROLL FOR NEXT