CJI Sakal
देश

Supreme Court : देशातील तीन महत्त्वाच्या खटल्यांवर सुनावणीत काय झालं?

सकाळ डिजिटल टीम

भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या निवृत्तीपूर्वी देशातील सर्वात महत्त्वाच्या अशा तीन खटल्यांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी आज पार पडली. यामध्ये प्रामुख्याने पेगासस, बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींची सुटका, PMLA निकालाविरूद्ध पुनरावलोकन यासारख्या महत्त्वाच्या प्रकरणांचा समावेस आहे. येत्या 26 ऑगस्ट म्हणजे उद्या रमना सेवानिवृत्त होत आहेत. त्यापूर्वी आज वरील अतिमहत्त्वाच्या प्रकरणांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली.

बिल्किस बानो प्रकरणात दोन आठवड्यात उत्तर द्या

बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली असून, त्याची स्वतंत्र सुनावणी आता २ आठवड्यांनी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने दोषींना त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच 11 दोषींच्या सुटकेवर गुजरात सरकारकडून उत्तर देण्यास सांगितले आहे. सामाजिक कार्यकर्त्या सुभाषिनी अली यांच्यासह चार जणांनी या प्रकरणातील ११ दोषींना सोडण्याचा गुजरात सरकारचा आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे.

पीएमएलए प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) निर्णयावर काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी दाखल केलेल्या पुनर्विलोकन याचिकेवर सुनावणी करताना, सर्वोच्च न्यायालयाने दोन मुद्द्यांवर आपल्या निकालाचे पुनरावलोकन करण्यास सहमती दर्शविली आहे.

फिरोजपूर येथील PM मोदींची सुरक्षेतील चुकीसाठी एसएसपी जबाबदार

पेगाससचा कोणताही पुरावा नाही

देशभरातील 40 हून अधिक पत्रकार आणि महत्वाच्या नेत्यांवर पाळत ठेवल्याप्रकरणी चर्चेत आले. पेगॅसिस स्पायवेअरसंबंधी (Pegasus Spyware) स्थापन केलेल्या स्वतंत्र समितीनं त्याचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. समितीला 29 फोन देण्यात आले होते आणि त्यात काही मालवेअर आढळले आहेत. 29 पैकी 5 फोनमध्ये काही मालवेअर होते. परंतु, ते Pegasus असल्याचं सांगितलं नाही. या पाच फोनमध्ये खराब सायबर सुरक्षेवर मालवेअर असल्याचा निष्कर्ष तांत्रिक समितीनं काढल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT