देश

Supreme Court : बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना SCचा दणका; आता सुनावणी...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेविरोधातील जनहित याचिकांवर सुनावणी न घेण्याची मागणी करणारी दोषींची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. तसेच बिल्किसच्या याचिकेला मुख्य याचिका मानून मेरीटनुसार पाचही याचिकांवर सुनावणी होईल, असे म्हटले आहे. हा मुक्त झालेल्या दोषींना मोठा धक्का मानला जात आहे. (Supreme Court news in Marathi)

खरं तर, सुभाषिनी अली आणि महुआ मोईत्रा यांच्यासह दाखल करण्यात आलेल्या पाचही याचिका दखलपात्र नसल्याचे दोषींच्या वकिलांनी म्हटले होते. या तिसऱ्या पक्षाच्या याचिका असून याला फारसं काही महत्त्व नाही. त्यावर न्यायमूर्ती अजय रस्तोगी म्हणाले की, पीडित बिल्किस स्वतः इथे आली आहे. बिल्किसच्या याचिकेला मेरीटवर घेऊन या याचिकांवर सुनावणी करता येईल. त्यामुळे इतर याचिकांचा महत्त्व कमी असल्याचा मुद्दा संपुष्टात येतो, असं ते म्हणाले.

२००२ च्या गुजरात दंगली प्रकरणातील ११ दोषींना सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षा झालेली असताना गुजरात सरकारने अकाली सुटका केली. या अकाली सुटकेला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर (पीआयएल) फेब्रुवारीच्या मध्यात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. बिल्किस बानो यांच्या याचिकेसह त्यावर सुनावणी होणार आहे.

न्यायमूर्ती अजय रस्तोगी म्हणाले की, याचिकाकर्त्याच्या वकिलाने अंतिम सुनावणीसाठी तयार व्हावे.या सुनावणीत केवळ कायदेशीर मुद्द्यांवरच चर्चा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT