देश

Swami Vivekananda Jayanti : स्वामी विवेकानंदांचे हे विचार देतील तुम्हाला नवी प्रेरणा; आयुष्यातील मरगळ झटकून व्हाल पुन्हा सज्ज!

स्वामी विवेकानंद यांचे विचार प्रत्येकाने अमलात आणावेत असे आहेत.

Aishwarya Musale

स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय युवक दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. यावरूनच आपल्या लक्षात येते, की राष्ट्रनिर्माणात युवकांचे महत्त्व स्वामी विवेकानंदांना माहीत होते. स्वामी विवेकानंदांनी आपली सारी व्याख्याने युवकांना उद्देशून दिली आहेत. आज १२ जानेवारी, आजच्याच दिवशी १८६३ साली कोलकातामध्ये त्यांचा जन्म झाला होता. आज त्यांची १५९ वी जयंती आहे. त्यांचे विचार ऐकून आपल्यामध्ये एक प्रकारची उर्जा संचारते. 

भारत देश हा अनेक संत, महापुरुषांनी बनलेला देश आहे. ज्यांचे विचार आपल्याला कित्येक पिढ्या प्रेरणा देत आले आहेत. या महापुरुषांच्या विचारांमुळे आपल्याला एक सकारात्मक संदेश मिळत असतो. संकटाच्या काळात जेव्हा मनुष्य खचून जातो, निराश होतो. तेव्हा आपण महापुरुषांचे विचार वाचतो आणि त्यामुळे पु्हा एकदा लढण्याचे बळ मिळते.

स्वामी विवेकानंद यांचे तेजस्वी विचार

  • उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होत नाही तोवर थांबू नका.

  • स्वतःला परिस्थितीचे गुलाम समजू नका. तुम्ही स्वतःचे भाग्यविधाते आहात. स्वतःला कमजोर समजने हे सर्वात मोठे पाप आहे.

  • स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.

  • आपले मज्जातंतू शक्तीसंपन्न करा. आपल्याला लोखंडी स्नायूंची व पोलादी मज्जातंतूंची आवश्यकता आहे. आपण पुष्कळ दिवस रडलो. आता रडणे पुरे, आता आपल्या पायावर उभे राहा व मनुष्य बना.

  • स्वतंत्र होण्याचं धाडस करा, तुमचे विचार जितके दूर जातील तितक्या लांब जाण्याचं धाडस करा. त्यामुळे तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा प्राप्त होईल.

  • मनुष्य प्रकृतीवर मात करण्यासाठी जन्माला आलेला आहे. प्रकृतीचा गुलाम होऊन राहण्यासाठी नव्हे.

  • तुमचा विकास आतून झाला पाहिजे. तुम्हाला कोणीही शिकवू शकत नाही . तुम्हाला कोणीही आध्यात्मिक बनवू शकत नाही. तुमच्या स्वतःच्या आत्म्याव्यतिरिक्त तुमचा दुसरा कोणीही शिक्षक नाही.

  • डोक्यावर जणू दुःखाचा मुकूट चढवून सुख मनुष्यापुढे उभे राहते. जो सुखाचे स्वागत करतो त्याने दुःखाचेही स्वागत केले पाहिजे.

  • हे जग एकप्रकारची व्यायामशाळाच आहे. जिथे आपण स्वत:ला शक्तिशाली बनवण्यासाठी येतो.

  • मी हे करू शकत नाही असं कधीही म्हणू नका, कारण तुमच्या अंर्तमनात प्रचंड शक्ति आहे. या शक्तिच्या मदतीनं तुम्ही अशक्य वाटणारं कामही शक्य करून दाखवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samarjeet Ghatge: समरजीत घाटगे पुन्हा भाजपमध्ये जाणार! तारीखही आली; स्वतःच सांगितलं घरवापसीचं कारण

IPL 2026 : रोहित शर्माला झटका... मुंबई इंडियन्सची हार होताच, समोर आली मोठी बातमी; समीर रिझवी ठरला कारणीभूत

GT vs RR Live : गुजरात टायटन्सचे नेतृत्व राशीद खान याच्याकडे; शुभमन गिल याला नेमकं काय झालं? IPL 2026 मध्ये मोठा ट्विस्ट

सीईटी परीक्षेत संतापजनक प्रकार, पेपरात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, कारवाईची मागणी

Horoscope News : 'या' तारखेपासून शनीदेव बदलणार 5 राशींचं नशीब ! शंकराची होणार कृपा, भाग्योदयाची सुरुवात

SCROLL FOR NEXT