कोल्हापूर : राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आहे. राज्य शासन संविधानाच्या मूलभूत तत्त्वांची पायमल्ली करत आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी ब्लॅक पँथर संघटनेने केली आहे. मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. निवेदनातील माहितीनुसार, सरकार निधर्मी असले पाहिजे, असे संविधानात म्हटले आहे; मात्र सरकार विशिष्ट धर्माला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबतची तक्रार कर्नाटकात द्यावी लागते. महाराष्ट्रात तक्रार घेतली जात नाही. शिष्टमंडळात सुभाष देसाई, संदीप कांबळे, प्रिया शिरगावकर, दयानंद कांबळे, तानाजी गोंधळी, मधुकर कांबळे यांचा समावेश होता.