देश

स्वीडनच्या स्कॅनियाने बस करारासाठी भारतीय अधिका-यांना दिली ‘लाच’; वाहनाच्या कागदपत्रांत केला फेरफार

सिद्धार्थ लाटकर

सातारा : वाेक्सवॅगन एजीच्या स्वीडिश ट्रक असलेल्या स्कॅनियाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या तपासाअंती कंपनीचे भारतातील कर्मचारी बस करारासाठी स्थानिक अधिका-यांना लाच द्यायचे असे आढळून आले. या प्रकाराची कंपनीने गंभीर देखील घेतली आहे. या संशयास्पद भ्रष्टाचाराची दखल घेण्यासाठी उपाययोजना करीत आहाेत असे स्कॅनियाचे प्रवक्ते करिन हॉलस्तान यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना कळविले आहे. जे या प्रकरणात गुंतले आहेत त्या व्यवस्थापकांनी कंपनीची नाेकरी सोडली आहे आणि स्कॅनियाने भारतात बस विक्री बंद केली आहे असेही करिन यांनी नमूद केले आहे.

सध्या तरी एकूण 19 प्रकरणात सुमारे 65000 युरोची ($77300) लाच देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. भारतातील राज्य बस कंपन्यांमधील अधिका-यांना हे पैसे दिल्याचे जर्मन सार्वजनिक प्रसारक झेडडीएफने मंगळवारी आंतरिक तपासणी अहवालाचा हवाला देऊन अशी माहिती दिली. या अहवालात 100 ट्रकसाठी वाहनांची खाेटी कागदपत्रे आणि नोंदणीपत्रे तयार करण्यात आली देशातील सरकारी कोळसा खाण कंपनीला ते विकू शकतील असे नमूद करण्यात आले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी हेनरिक हेन्रिकसन यांनी लाच दिल्याचा संशय असलेल्या काही घटना आढळल्या आणि खासगी वितरकांना लाच दिल्याचा पुरावा असल्याचे बाेलले जात आहे जे आम्हाला मान्य नाही. सन 2013 तेे 2017 या कालावधीत बस ऑर्डरशी संबंधित गैरव्यवहार आढळला, असे व्हीडब्ल्यूच्या व्यावसायिक-वाहन युनिट ट्रॅटन यांनी ईमेलद्वारे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ट्रॅटॉन हे स्कॅनिया आणि मॅन या ब्रँडचे आणि ब्राझीलमध्ये ट्रकच्या छोट्या युनिटचा समावेश आहे.

ट्रॅटॉन म्हणाले की, अमेरिकेच्या न्याय विभागाच्या त्याच्या डिझेल उत्सर्जनाच्या घोटाळ्याशी संबंधित बाह्य मॉनिटरला या प्रकरणाची माहिती वर्षभरापूर्वी देण्यात आली होती असे ब्लूमबर्गने नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT