food
food 
देश

जेवणात बॅण्डेज सापडल्याने स्वीगीने मागितली माफी 

वृत्तसंस्था

चेन्नई : ऑनलाईन फूड ऑर्डर करणे आता फार काही नवीन गोष्ट नाही. परंतु, स्विगीवरुन अशाप्रकारे ऑर्डर करणे एका व्यक्तीला चांगलच महागात पडले आहे. जवळपास अर्ध जेवण खाल्ल्यानंतर त्या व्यक्तीला त्यात रक्त लागलेले बॅण्डेज सापडले. ही घडना दोन दिवसापूर्वी घडली. त्यानंतर आता स्वीगीने माफी मागितली असून, ज्या आउटलेटमधून हे जेवण मागवण्यात आले होते त्याला निलंबित करण्यात आले आहे.

बालामुरुगन दीनदयालन नावाच्या व्यक्तीने स्विगीवरुन नॉनवेज जेवण ऑर्डर केले होते. जवळपास अर्ध जेवण झाल्यानंतर बालामुरुगनला जेवणाच्या पाकिटात रक्त लागलेले बॅण्डेज सापडले होते. यानंतर बालामुरुगनने याबाबत रेस्टॉरंटकडे तक्रार केली. परंतु, त्यावर हॉटेलकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

या सगळ्या प्रकारानंतर बालामुरुगनने स्विगीला टॅग करत फेसबुक पोस्ट लिहिली. "अर्ध जेवण खाल्ल्यानंतर मला हे रक्त लागलेले बॅण्डेज मिळाले. मी रेस्टॉरंटशी संपर्क केला, पण त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. ते एवढंच म्हणाले की, आम्ही दुसरे जेवण पाठवतो. असे वाईट जेवण पुन्हा कोण खाईल. मी स्विगीशी बोलण्याचाही प्रयत्न केला. पण जेवणाची डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांच्याशी कॉलवरुन थेट बोलण्याचा कोणताही पर्याय नाही. त्यांच्यासोबत केवळ चॅटवर बोलता येते, पण ते तिथेही उत्तर देत नाही."

मला रेस्टॉरंट आणि स्विगी या दोघांवर खटला चालवायचा आहे. कारण स्विगीने अशा रेस्टॉरंटसोबत भागीदारी केली आहे. जे स्वच्छतेच्या छोट्या-मोठ्या गोष्टींची काळजी घेत नाही. उदाहरणार्थ हॅण्ड ग्लोव्जचा वापर, बोटांना जखम झाली तर कर्मचाऱ्यांना किचनमध्ये येण्यास मज्जाव घालणे," 
- बालामुरुगन

यानंतर स्विगीने बालामुरुगन दीनदयालन यांच्या या पोस्टवर स्पष्टीकरण दिले आहे. स्विगीने माफी मागत सांगितले की, "आम्ही या प्रकरणाची कसून चौकशी करु आणि हे नेमके कसे घडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी कारवाई, शूटर्सचा सर्वात मोठ्या मदतनीसाला राजस्थानमधून अटक

SCROLL FOR NEXT