Swiss-Bank
Swiss-Bank 
देश

पहिले यश भारताच्या पदरात

पीटीआय

नवी दिल्ली - भारत सरकारने काळ्या पैशाविरोधात उघडलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. स्विस बॅंकांमध्ये असलेल्या भारतीयांच्या खात्यांचा तपशील असलेली पहिली यादी भारताला सोपविण्यात आल्याची माहिती स्वित्झर्लंडच्या फेडरल टॅक्‍स ॲडमिनिस्ट्रेशनच्या (एफडीए) प्रवक्‍त्याने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

माहिती आदान-प्रदानासंदर्भातील नव्या व्यवस्थेअंतर्गत ७५ देशांना स्विस बॅंकेतील खातेदारांचा तपशील दिला असून, यात भारताचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील माहिती २०२० मध्ये दिली जाणार असल्याचेही प्रवक्‍त्याने स्पष्ट केले. ‘एईओआय’ नियमावलीअंतर्गत भारताला स्वित्झर्लंडकडून प्रथमच काळ्या पैशाबाबतची माहिती मिळाली. 

स्विस बॅंकांमध्ये सध्या चालू असलेली व २०१८ दरम्यान बंद करण्यात आलेल्या खात्यांची माहिती ‘एफटीए’ने भारताला दिली आहे. या खात्यांची संख्या नेमकी किती आहे आणि त्याच्याशी संबंधित मालमत्तेचा तपशील देण्यास मात्र ‘एफटीए’च्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. 

माहितीमध्ये याचा समावेश 
माहिती आदान-प्रदान व्यवस्थेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या माहितीमध्ये स्विस बॅंकेत खाते असलेल्यांचे नाव, पत्ता, तो राहत असलेला देश, करनोंदणी क्रमांक, वित्तीय संस्थेशी संबंधित माहिती, खात्यावरील शिल्लक तसेच भांडवली उत्पन्न, यांचा समावेश असतो.

माहितीचे आदान-प्रदान
३१ लाख खात्यांची माहिती प्रदान
२४ लाख खात्यांची माहिती प्राप्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT