Rabindranath Tagore  sakal
देश

Rabindranath Tagore : टागोर पुण्यतिथीचा कार्यक्रम ‘बांगलादेश भवना’तून बाहेर

रवींद्रनाथ टागोर यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे स्थळ बदलण्यात आले आहे. शांतीनिकेतनमधील बांगलादेश भवन येथे होणारा कार्यक्रम आता ओल्ड फेअर मैदानावर होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

श्‍यामल रॉय

कोलकता : रवींद्रनाथ टागोर यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे स्थळ बदलण्यात आले आहे. शांतीनिकेतनमधील बांगलादेश भवन येथे होणारा कार्यक्रम आता ओल्ड फेअर मैदानावर होणार आहे. स्थळात बदल करण्याचे कारण विश्‍वभारती विद्यापीठाने स्पष्ट केले नाही. मात्र, कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी आयोजित केल्यास सुरक्षेचा धोका असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.

रवींद्रनाथ टागोर यांच्या पुण्यतिथीनिमित्त वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन बांगलादेश भवनमध्ये केले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या तक्कालिन पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते बांगलादेश भवनचे मे २०१८मध्ये उद्‍घाटन झाले होते.

हसीना यांच्या पुढाकाराने उभारलेल्या या वास्तूत संग्रहालय, ग्रंथालय आणि परिषदेसाठी सभागृह आहे. शेख मुजीबर रहमान यांच्या अर्धपुतळ्यासह अनेक वस्तू या वास्तूत ठेवण्यात आल्या आहेत. बांगलादेशातील सुमारे ६० ते ८० विद्यार्थी दरवर्षी विश्व भारती विद्यापीठात पदवीपूर्व आणि पीएच.डी अभ्यासक्रम शिकण्यासाठी येथे येतात. येथे येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये बांगलादेशींची संख्या सर्वाधिक आहे. सध्या तेथे १०० बांगलादेशी विद्यार्थी आहेत.

शेख मुजिबूर यांचे स्मारक

मुजिबूर रेहमान हे महाविद्यालयीन दशेत १९४० मध्ये कोलकत्यातील इस्लामिया महाविद्यालयात (मौलाना आझाद महाविद्यालय) शिकत होते. तेव्हा ते बेकर वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरील २४ क्रमांकाच्या खोलीत राहत होते. राज्य सरकारने १९९८ मध्ये ही खोली रेहमान यांचे स्मारक म्हणून घोषित केली. बांगलादेशामधील हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांनी या खोलीकडे लक्ष ठेवून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT