

Satej Patil vs Sharangdhar Deshmukh
esakal
Satej Patil Power Misuse Allegations : काँग्रेसमध्ये असताना सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकपद आणि स्थायी समिती सभापतीपद भूषविलेले शारंगधर देशमुख आता त्यांच्याच विरोधात आक्रमक झाले आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर देशमुख सतेज पाटील यांच्यावर टीका करत आहेत. ‘सत्तेचा गैरवापर’ केल्याचा आरोप करणाऱ्या सतेज पाटील यांनीच जिल्ह्यात सर्वाधिक सत्तेचा गैरवापर केल्याची टीका देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. माजी महापौर सुनील कदम यांच्या स्वीकृत नगरसेवकपदाविरोधात तक्रार करण्यासाठी सतेज पाटील यांनीच आपल्याला पाठविले होते, असा दावाही त्यांनी केला.