Vijaykant
Vijaykant 
देश

विजयकांत यांचा अण्णाद्रमुकला झटका

सकाळन्यूजनेटवर्क

चेन्नई - तमिळनाडूत सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि भाजप आघाडीला निवडणुकी-आधीच पहिला झटका बसला आहे. अभिनेते विजयकांत यांच्या नेतृत्वाखालील ‘डीएमडीके’ हा पक्ष या आघाडीतून मंगळवारी बाहेर पडला. चर्चेच्या तीन फेऱ्यांनंतर अण्णाद्रमुकने आश्‍वासनानुसार जागा व मागणी केलेले मतदारसंघ न दिल्याचा दावा या पक्षाने केला आहे.

विजयकांत या अभिनेत्याने स्थापन केलेल्या ‘डीएमडीके’ या पक्षाने यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीसाठी अण्णाद्रमुक व भाजपच्या आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अण्णाद्रमुकने जागा वाटपात आश्‍वासन न पाळल्याने आघाडीतून बाहेर पडत असल्याचे विजयकांत यांनी आज सांगितले. ते म्हणाले की, पदाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. डीएमडीके’ने २०१९ ची लोकसभा निवडणूक या आघाडीच्या साथीने लढली होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अण्णाद्रमुकने ‘पीएमके’ला २३ तर भाजपला २० जागा दिल्या आहेत. राज्यात विधानसभेच्या एकूण २३४ जागा आहेत. कन्‍याकुमारी येथे लोकसभेसाठी पोटनिवडणूक होणार असून ही जागा भाजपला दिली आहे.

कमल हसन यांचा पक्ष १५४ जागा लढविणार
अभिनेते व राजकीय नेते कमल हसन यांच्या मक्कल निधी मय्यम (एमएनआय) यापक्षाने दोन सहकारी पक्षांबरोबर जागावाटप पूर्ण केले आहे. अन्य एक अभिनेते व नेते शरतकुमार यांच्या ‘ऑल इंडिया समथुवा मक्कल कच्ची’ आणि ‘इंडिया जननायक कच्ची’  या पक्षांसह ‘एमएनआय’ची यंदाची तमिळनाडू विधानसभा निवडणूक लढत आहे. कमल हसन यांनी १५४ जागा लढविण्याचा निर्णय घेतला असून दोन्ही मित्र पक्षांना प्रत्येकी ४० जागा सोडल्या आहेत.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT