Crime News Esakal
देश

Crime News: विम्याचे एक कोटी मिळविण्यासाठी मृत्यूचा बनाव केला अन्...त्याच पैशांसाठी मित्राने घेतला जीव

काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘रेस’ चित्रपटात वैयक्तिक विम्याचे पैसे मिळविण्यासाठी चित्रपटाचा नायक ज्याप्रमाणे मृत्यूचा बनाव रचतो, अगदी तसाच प्रकार तमिळनाडूत घडला आहे.

सकाळ वृत्तसेवा

काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘रेस’ चित्रपटात वैयक्तिक विम्याचे पैसे मिळविण्यासाठी चित्रपटाचा नायक ज्याप्रमाणे मृत्यूचा बनाव रचतो, अगदी तसाच प्रकार तमिळनाडूत घडला आहे. विम्याचे एक कोटी रुपये मिळविण्यासाठी एका जिम ट्रेनरने मृत्यूचा बनाव रचला आणि यासाठी त्याने मित्राची हत्या केली. सुरेश आर. (वय ३८) असे आरोपीचे नाव. त्याच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

तमिळनाडूत ७ सप्टेंबर २०२३ रोजी चेंगलपेट भागातील एका झोपडीला आग लागली. त्यात एकाचा मृत्यू झाला. ही आग दुर्घटना असल्याचे समजून पोलिसांनी तपासाची फाइल बंद केली. मात्र त्यानंतर काही दिवसांनी पोलिसांच्या हाती लागलेले पुरावे हे धक्कादायक होते आणि त्यामुळे त्यांनी पुन्हा नव्याने तपास सुरू केला. झोपडीच्या आगीत मृत्युमुखी पडलेला व्यक्ती म्हणून ज्याला गृहीत धरले होते, प्रत्यक्षात ती व्यक्ती जिवंतच होती. त्याने आपल्या मृत्यूचा बनाव करण्यासाठी जिवलग मित्राची हत्या केल्याचे तपासातून निदर्शनास आले.

सुरेश आर. नावाचा तरुण हा चेन्नईत फिजिकल ट्रेनर म्हणून काम करत होता. गेल्या वर्षी तो चेन्नईहून गावी चेंगलपेटच्या अल्लानूर येथे राहण्यासाठी आला. मात्र १६ सप्टेंबरला सुरेशच्या घराला आग लागली आणि त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यावेळी त्याच्या आईने आपला मुलगा सुरेशचा आगीत मृत्यू झाल्याचे सांगितले.

परंतु डिसेंबर महिन्यात सुरेश जिवंत असल्याचा पोलिसांना सुगावा लागला. या तपासादरम्यान, सुरेशचा मित्र दिल्ली बाबू (वय ३९) हा बेपत्ता असल्याचे आढळून आले. बाबूच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती. बाबूचा मोठा भाऊ पलानी यांनी पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, बाबू हा सुरेशच्या घरी नियमितपणे जात होता.

त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीच बळावला. सुरेशच्या घराला आग लागली तेव्हा बाबूदेखील त्या काळात या घराजवळ असल्याचे अनेकांनी पाहिले होते, तसेच सुरेश जिवंत असल्याचेही पोलिसांना कळाले. दरम्यान, पेंटर असलेल्या दिल्ली बाबू (वय ३८) याच्या पालकांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेऊन बेपत्ता मुलाचा शोध घेण्याची मागणी करणारी हेबियस कॉर्पस पिटिशन दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने पोलिसांना तपासाचे आदेश दिले आणि याप्रमाणे इन्होरे आणि ओरथी पोलिसांनी सुरेश आर.चा कारनामा उघडकीस आणला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant : १ डिसेंबरला नेमकं काय होणार? CJI सूर्यकांतांचा गूढ इशारा… सुप्रीम कोर्टात मोठा बदल की काहीतरी वेगळंच?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर; उडुपीतील श्रीकृष्ण मठाला देणार भेट

Zudio Black Friday सेल आजपासून सुरू! 40% पासून डिस्काउंट ऑफर्स; सर्वात मोठ्या सेलमध्ये 'या' वस्तू जास्त स्वस्त, खरेदीपूर्वी हे बघाच

विराट, रोहित अन् रिषभ पंत...! धोनीच्या घरी सजली भारतीय क्रिकेटपटूंची 'मैफिल', पाहा VIDEO

Nagpur Accident : शहरात अपघातांसह मृत्यूंची संख्या घटली; आपरेशन ‘यू-टर्न’चे यश

SCROLL FOR NEXT