देश

तमिळनाडूतील वादळग्रस्तांना राज्याकडून भरपाई 

पीटीआय

पुदुकोट्टी (तमिळनाडू) : तमिळनाडूतील "गज' वादळाचा तडाखा बसलेल्या जिल्ह्यांना मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी मंगळवारी भेट दिली. तेथील नुकसानग्रस्तांना त्यांनी मदतीचे वाटप केले. केंद्र सरकारकडून मदत मिळविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरच भेटणार असल्याचे त्यांनी सूचित केले. 

पलनीस्वामी म्हणाले, की मोदी यांच्या भेटीसाठी आम्ही वेळ मागितली आहे. गुरुवारपर्यंत (ता. 22) भेट होण्याची शक्‍यता आहे. वादळामुळे राज्यात झालेल्या नुकसानाची माहिती व त्याचे पुरावे केंद्राला सादर करणार असून, मदतनिधी मिळविण्यासाठी सरकार निश्‍चितच प्रयत्न करणार आहे. वादळाचा फटका बसलेल्या नागपट्टीनम, तिरुवरुर जिल्हा तसेच कावेरीच्या त्रिभुज परिसरातील मदतकार्यात पावसामुळे व्यत्यय आला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने या परिसरात मुसळधार पाऊस पडला, असा अंदाज हवमान विभागाने वर्तविला आहे. 

वादळानंतरची परिस्थिती हाताळण्यावरून राज्य सरकारवर टीका होत असताना, मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी मदत व पुनवर्सन कार्यासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची सोमवारी (ता. 19) घोषणा केली होती. राजकीय विरोध दूर ठेवून मदतकार्यात सहभागी होण्याचे आवाहन पलानीस्वामी यांनी विरोधकांना केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या भेटीत नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. नागपट्टीनम जिल्ह्यातील काही भागांत नागरिकांनी निदर्शने करीत पाणीपुरवठा व वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. 

मुलांना गमाविलेल्या मातेला 30 लाख 

पट्टुकोटी येथे वादळाने भिंत कोसळून तीन मुलांना गमाविलेल्या महिलेला पलानीस्वामी यांनी 30 लाखांची नुकसानभरपाई दिली. वादळात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची भरपाई देण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT