Teacher beat student Sakal
देश

माठातील पाणी प्यायल्याने मारहाण केलेल्या दलित विद्यार्थ्याचा मृत्यू; आमदाराचा राजीनामा

सकाळ डिजिटल टीम

जयपूर : राजस्थानमध्ये बरन जिल्ह्यातील अत्रू येथील शाळेतील शिक्षकाच्या पाण्याच्या माठातील पाणी पिल्यामुळे इंद्र कुमार या दलित विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर, आज आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशात घडत असलेल्या अशा घटनामुळे संताप व्यक्त केला जात होता. या विद्यार्थ्याचा त्यानंतर मृत्यू झाल्यामुळे अत्रू येथील आमदाराने राजीनामा दिला आहे.

शिक्षकाने केलेल्या या मारहाणीत विद्यार्थ्याच्या कानाची नस फुटली आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शनिवारी सकाळी 11 वाजता दलित विद्यार्थी इंद्र कुमारचा मृत्यू झाला. त्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली. दलितांच्या समस्या कधी सुटणार असा सवाल केला जाऊ लागला. त्यानंतर आता तेथील आमदार पानचंद मेघवाल यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

आमदार पानचंद मेघवाल हे काँग्रेसचे आमदार असून बिरन जिल्ह्यातील अत्रू मतदारसंघातून ते आमदार होते. ही घटना घडल्यानंतर याचे देशभर पडसाद उमटले होते. त्यानंतर मेघवाल यांना ही घटना सहन न झाल्याने आपला राजीनामा दिला. त्याचबरोबर मारहाण केलेल्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की, "जालोरमधील 9 वर्षीय दलित विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे मला खूप दुःख झाले आहे त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. दलित आणि वंचित समुदायांवर सतत अत्याचार आणि अत्याचार केले जात आहेत हे पाहून मला खूप दु:ख होत आहे." असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 World Cup : हस्तांदोलन नाहीच! भारतीय संघाच्या अंतिम ११ मध्ये दोन बदल; पाकिस्तानला टॉसच्या वेळीच दिला दम

Pune Bharat Taxi: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांसाठी भारत टॅक्सी सेवा सुरू; दर किती आणि कसे आकारणार?

IND vs PAK : जय शाह यांचा 'Dhurandhar' प्लान! पाकड्यांना त्यांची जागा दाखवण्याची सोडणार नाही संधी, सामन्यापूर्वीच होणार 'गेम'

नवरा असावा तर असा ! बायकोसाठी हार्दिकने पाहिलंय 'हे' स्वप्न; "तिने राणीसारखं मोठ्या गाडीत बसावं आणि मी.."

Latest Marathi News Live Update : पुण्यातील भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

SCROLL FOR NEXT