flood  Sakal
देश

मॅडमची एंट्री खुर्च्यांवरून, पुरात विद्यार्थ्यांना खेळावी लागते 'संगीतखुर्ची'

या प्रकारानंतर सदर शिक्षिकेवर कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ : उत्तरप्रदेशमध्ये एका शाळेतील शिक्षिकेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पुराच्या पाण्यातून सदर शिक्षिका येत असताना विद्यार्थ्यांनी ठेवलेल्या प्लास्टिक खुर्च्याचा वापर करताना दिसत आहे तर विद्यार्थी पावसात भिजताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून यानंतर सदर शिक्षिकेवर कारवाई करण्यात आली आहे.

उत्तरप्रदेशमधील एका शाळेतील विद्यार्थ्यांनी ठेवलेल्या प्लास्टिकच्या खुर्च्यांवर चढून पूरग्रस्त शाळेत प्रवेश केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सदर शिक्षिकेला निलंबित करण्यात आलं असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. दरम्यान, व्हायरल व्हिडीओमध्ये शाळेतील मुले पाण्यातून फिरताना दिसत आहे आणि त्यांनी शिक्षिकेला चालण्यासाठी प्लास्टिकच्या खुर्च्या लावल्या आहेत. शिक्षिका मुलांनी ठेवलेल्या या खुर्च्यावरून येत कोरड्या जागेवर पोहोचताना दिसत आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात असून मुलं भिजत आहेत पण शिक्षिका पाण्यातून येण्यासाठी खुर्च्याचा वापर करते अशा टीका करण्यात येत आहेत. त्यानंतर या शिक्षिकेवर कारवाई करण्यात आली आहे. असाच मध्यप्रदेशमधील शाळेतील एक व्हिडिओ व्हायरल होत असून शाळेत छत गळत असल्यामुळे विद्यार्थ्यांना छत्र्या घेऊन अभ्यास करावा लागत असल्याचं या व्हिडिओमध्ये होतं. त्यानंतर या प्रकारावरही नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT