Teddy Day 2023 Esakal
देश

Teddy Day 2023: टेडी हे नाव कस पडलं आणि टेडी डे नेमका कुठून आला?

टेडी बेअरचा शोध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर यांच्या नावामुळेच लागला.

दिपाली सुसर

Teddy Day 2023: प्रेमी युगुलांसाठी फेब्रुवारी महिना अत्यंत महत्त्वाचा असतो. या महिन्यातील व्हॅलेंटाइन वीकमधील विविध दिवसाचे फार वेगळे महत्त्व असते. तसेच फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली की, तरूणांमध्ये 14 फेब्रुवारीची म्हणजेच ‘व्हॅलेंटाइन डे’ची उत्सुकता मोठ्या असते. या प्रेमाच्या सप्ताहातील चॉकलेट डे नंतर येणारा दिवस म्हणजे ‘टेडी डे’ हा या सप्ताहातील चौथा दिवस असतो.बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टेडी विकायला असतात. प्रत्येक प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. व्हेलेंटाईन वीकमध्ये प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने आपले प्रेम व्यक्त करत असतो. तुम्हला सर्वांना प्रश्न पडला असेल हा टेडी हे नाव कस पडलं आणि टेडी डे नेमका कुठून आला? तर आज आपण टेडी डेच्या निमित्ताने टेडी हे नाव कस पडलं आणि टेडी डे नेमका कुठून आला? याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

टेडी हे नाव कस पडलं त्या मागची कहाणी...

वृत्तपत्रातील चित्र पाहून, व्यापारी मॉरिस मिचटॉम यांनी अस्वलाच्या मुलाच्या आकारात एक खेळणं बनवण्याचा विचार केला. त्यांनी त्याची पत्नी रोजसोबत मिळून त्याची रचना केली. या खेळण्याला ‘टेडी’ असे नाव देण्यात आले. टेडी हे नाव देण्यामागचे कारण म्हणजे अध्यक्ष रुझवेल्ट यांचे टोपणनाव टेडी होते. टेडी बेअरचा शोध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर यांच्या नावामुळेच लागला. एका व्यावसायिक जोडप्याने ते बनवले. व्हॅलेंटाईन वीकमध्ये टेडी डे साजरा करण्यामागे मुलीच कारणीभूत असतात. खरं तर, बहुतेक मुलींना भरलेले टेडी आवडतात. मुले टेडी बेअर भेट देऊन त्यांच्या तिला प्रभावित करतात, म्हणून 10 फेब्रुवारीला टेडी डे देखील व्हॅलेंटाईन वीकमध्ये समाविष्ट करण्यात आला.

टेडी डेचा इतिहास काय?

14 नोव्हेंबर 1902 रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट मिसिसिपीच्या जंगलात शिकार करायला गेले होते. त्याच्यासोबत असिस्टंट होल्ट कॉलियर होते. येथे कॉलरने जखमी काळ्या अस्वलाला पकडले आणि झाडाला बांधले. त्यानंतर असिस्टंटने अध्यक्षांकडे अस्वलाला गोळी घालण्याची परवानगी मागितली. पण जखमी अवस्थेत अस्वलाला पाहून अध्यक्ष रुझवेल्ट यांचे हृदय पाघळले आणि त्यांनी प्राण्याला मारण्यास नकार दिला. 16 नोव्हेंबर रोजी, वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्राने व्यंगचित्रकार क्लिफर्ड बेरीमन यांनी घटनेवर आधारित एक छायाचित्र प्रदर्शित केले.

व्हॅलेंटाईन वीकमध्ये टेडी डे साजरा करण्यामागे मुलीच कारणीभूत आहेत. बऱ्याच मुलींना सॉफ्टटॉय आवडतात. मुलं आपल्या प्रेयसीला हे टेडीबेअर भेट म्हणून देऊन यांना खुश करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच 10 फेब्रुवारीला टेडी डेचा देखील व्हॅलेंटाईन वीकमध्ये समावेश करण्यात आला. हा टेडी डे देखील तरुणाईंमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: ''दरी मिटवायची..? दिवाळीच्या फराळाएवढं हे सोपं नाही'', पंकजा मुंडेंच्या भूमिकेवर हाके काय म्हणाले?

Pune News : ट्रस्टच्या जागेत जैन मंदिरच! धर्मादाय आयुक्तांकडे पुणे विभागाच्या सह आयुक्तांनी सादर केला अहवाल

Nilesh Ghaywal : नीलेश घायवळच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनमधील उच्चायुक्तांशी केला पत्रव्यवहार

8th pay commission: जेवढा उशीर तेवढा फायदा! एकरकमी मिळणार 6,00,000 रुपये, किती असेल फिटमेंट फॅक्टर?

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT