Tej Pratap Yadav likely to announce a new political party; Anushka’s rumored presence adds to the speculation.  esakal
देश

Tej Pratap Yadav: तेजप्रताप यादव नव्या पक्षाची घोषणा करणार? , अनुष्काही असणार सोबत!

Tej Pratap Yadav Political Strategy: राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी तेजप्रताप यादव यांना सहा वर्षांसाठी पक्षातून बडतर्फ केलेलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Tej Pratap Yadav may launch a new party: लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र आणि समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तेजप्रताप यादव आज(शुक्रवार) त्यांच्या नवीन पक्षाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या नव्या राजकीय वाटचालीत त्यांना त्यांची मैत्रीण अनुष्काचीही साथ मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. माध्यमांमध्ये यासंबंधीच्या विविध बातम्या येत आहेत, मात्र अद्यापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

तेजप्रताप यादव आणि अनुष्का यांचं कथित नातं सर्वांसमोर आल्यानंतर राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी तेजप्रताप यादव यांना सहा वर्षांसाठी पक्षातून बडतर्फ केलेलं आहे. शिवाय, कुटुंबातूनही बाहेर काढलं आहे. तेव्हापासून तेजप्रताप यादव पाटणामधील आपल्या शासकीय निवासस्थानात राहत आहेत. तसेच, सोशल मीडियावर आतापर्यंत त्यांचे वेगवेगळे भावनिक व्हिडिओही समोर आलेले आहेत.

नुकतच १० जुलै रोजी तेजप्रताप यादव वैशाली जिल्ह्यातील महुआ येथे गेले होते. तिथे त्यांनी आपल्या गाडीवरील राजदचा झेंडा काढून दुसरा झेंडा लावला होता. ज्यात लालू प्रसाद यादव यांचा चेहार नव्हता. यानंतर बिहारच्या राजकारणात नक्कीच काहीतरी मोठं घडणार, अशा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

तेजप्रताप यादव यांनी महुआ येथे आपल्या समर्थाकांसोबत बैठक केली आणि या विधानसभा जागेवरून निवडणूक लढणार असल्याचेही संकेत दिले. तेजप्रताप यादव महुआ मतदारसंघातून २०१५ ते २०२० पर्यंत आमदार होते आणि या जागेवर त्यांचा कायम डोळा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pan Masala New Government Rules : पान मसाला कंपन्यांसाठी सरकारने जारी केले नवे निर्देश; जाणून घ्या, नवा नियम काय असणार?

Pune News : फसवणूक केलेले १४ कोटी महिनाभरात परत करू; आरोपींचे न्यायालयात हमीपत्र सादर; संगणक अभियंत्यासह पत्नीची फसवणूक प्रकरण!

Latest Marathi News Live Update : कांदिवली एएनसीकडून मोठी कारवाई करत ५० लाख रुपये किमतीचे ड्रग्स जप्त

चाहत्यांच्या गळ्यातलं ताइत, खलनायकांची खलनायिका पुन्हा परत येतेय; कोण आहे ती अभिनेत्री? तुम्ही ओळखलंत का?

Mumbai News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! सायन उड्डाणपूल खुला होणार; पण कधी? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT