Tejpratap son of laluprasad yadav Govardhan mountain parikrama stopped by police Gurupournima  sakal
देश

मोटारीतून गोवर्धन परिक्रमेस तेजप्रतापना मनाई

मंदिर समिती पदाधिकारी, पोलिसांनी रोखल्यामुळे संताप

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली/मथुरा : पिता लालूप्रसाद यादव लवकर बरे व्हावे म्हणून मथुरेतील गोवर्धन पर्वताची परिक्रमा मोटारीतून करण्याचा धाकटे पुत्र तेजप्रताप यांचा संकल्प पूर्ण होऊ शकला नाही. मंदिर परिसरात वाहन आणण्यास मनाई असल्यामुळे त्यांना रोखण्यात आले. तेजप्रताप मंगळवारी मथुरेत आले होते. त्यांना गिरिराज महाराज मंदिराला मोटारीतून प्रदक्षिणा घालायची होती. त्यांची ही चमत्कारिक विनंती मंदिर व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी फेटाळली. गुरुपौर्णिमेमुळे भाविकांची प्रचंड गर्दी असल्याचेही त्यांना सांगण्यात आले.

बॅरीकेडपाशी त्यांची मोटार पोलिसांनी थांबवली. त्यामुळे तेजप्रताप संतापले. त्यांनी या प्रसंगाची चित्रफीत सोशल मिडीयावर पोस्ट केली. उत्तर प्रदेश पोलिस आपल्याला रोखत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर ते जवळच्या पोलिस चौकीत गेले. मोटारीतून मंदिर परिसरात प्रवेश करण्याची औपचारिक परवानगी मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न होता, मात्र चौकी अधिकाऱ्यानेही त्यांची विनंती नाकारली. गोवर्धनचे मंडळ अधिकारी गौरव त्रिपाठी यांनी सांगितले की, आम्ही केवळ आणीबाणीच्या कारणासाठी येणाऱ्या वाहनांना प्रवेशाची परवानगी देत आहोत. ज्यांना परिक्रमा करायची आहे त्यांना ती केवळ पायी करण्याची परवानगी आहे.

रुग्णालयात गीतापाठास मनाई

लालूप्रसाद यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तेथे गीतापाठ करण्यास तसेच ऐकण्यास मनाई केल्याचा आरोप तेजप्रताप यांनी केला होता. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. वडिलांना गीतापाठ म्हणण्याची आणि ऐकण्याची खूप आवड आहे, मात्र त्या अज्ञानी व्यक्तीला हे माहीत नाही की या महापापाची किंमत त्याला याच जन्मात चुकवावी लागेल, असे तेजप्रताप यांनी नमूद केले होते. त्यांनी गीतापाठ करण्याचे गीता ही संपूर्ण मानवजातीच्या उद्धारासाठी असून कोणत्याही वर्णाची व्यक्ती कोणत्याही देशात श्रद्धापूर्वक गीतापाठ करून परमोच्च सिद्धी प्राप्त करू शकते. कल्याणाची इच्छा बाळगलेल्या व्यक्तीने गीता वाचावी आणि दुसऱ्यांना शिकवावी. हाच कल्याणकारी मार्ग आहे, असेही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हरच्या बाजूला मान खाली घालून बसलेले मनोज जरांगे; तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू, नेमकं काय झालं?

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

Chamoli Tunnel Tragedy: ३० तासांनंतरही ३ मजूर बेपत्ता; बोगद्यातील साचलेले पाणी ठरतेय रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मुख्य अडथळा

Marathi News Live Updates : पुण्यातील डेक्कन परिसरातील कॅफेत पहाटे कोयता गँगचा धुमाकूळ

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT