telangana acb raids latest update ex hmda director shiva balakrishna corruption 100 crore rupees assests
telangana acb raids latest update ex hmda director shiva balakrishna corruption 100 crore rupees assests  
देश

ACB Raid : सरकारी अधिकाऱ्याच्या घरी सापडलं 100 कोटींचं घबाड! 40 लाख कॅश, 2 किलो सोन्यासह पैसे मोजायची मशिनही...

रोहित कणसे

तेलंगना येथे अँटी करप्शन ब्यूरोने एका सरकारी आधिकाऱ्याच्या घरातून तब्बल 100 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एसीबीच्या अधिकऱ्यांनी भुधवारी तेलंगाना राज्य रियल इस्टेट नियामक प्राधिकरण (टीएसआरइआरए)चे सचिव आणि मेट्रो रेल योजनेचे अधिकारी एस.बालकृष्ण यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली. इतकेच नाही तर त्यांनी यापूर्वी हैदराबाद मेट्रोपॉलिट डेव्हलपमेंट अथॉरिटी (एचएमडीए)मध्ये टाउन प्लॅमिंगचे निर्देशक म्हणून देखील काम केलं होतं.

इतकेच नाही तर त्यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 14 पथकांकडून दिवसभर छापेमारी सुरू होती. इतकेच नाही गुरुवारी पुन्हा हे सुरू होण्याची शक्यता आहे. बाळकृष्ण यांचे घर, कार्यालये, त्यांच्या नातेवाईकांच्या घरांवर एकाच वेळी छापे टाकून 100 कोटींहून अधिक ची मालमत्ता जप्त करण्यात आली.

आतापर्यंत सुमारे 40 लाखांची रोकड, दोन किलो सोने, जंगम-स्थावर मालमत्तेची कागदपत्रे, 60 महागडी मनगटी घड्याळे, 14 मोबाइल फोन आणि 10 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. या अधिकाऱ्याचे बँक लॉकर अद्याप उघडण्यात आलेले नाहीत. एसीबीला किमान चार बँकांमधील लॉकर सापडले आहते

एसीबीच्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्याच्या घरी रोकड मोजण्याची मशीन सापडल्याची माहिती आहे. एचएमडीएमध्ये काम केल्यापासून त्यांनी संपत्ती गोळा करणे सुरू केले होते सध्या सुरू असलेल्या छाप्यांमध्ये आणखी मालमत्ता सापडण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT