Telangana Elections To Be Held election commision
Telangana Elections To Be Held election commision 
देश

तेलंगणात निवडणूक आयोगाची लगबग

वृत्तसंस्था

हैदराबाद- तेलंगणाची विधानसभा विसर्जित करण्यात आल्यामुळे मतदार यादीतील नावे आणि छायाचित्रांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी राबविण्यात येत असलेली मोहीम थांबविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. राज्यातील विधानसभेच्या निवडणुका लवकर होण्याची शक्‍यता गृहित धरून निवडणूक आयोग तयारीला लागला आहे. निवडणुकीसाठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाचे तीन सदस्यीय पथक मंगळवारी हैदराबादमध्ये दाखल होत आहे. 

तेलंगणचे मुख्य निवडणूक अधिकारी रजतकुमार यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील विधानसभेच्या निवडणुका लवकर होण्याची शक्‍यता गृहित धरून मतदार याद्यांमधील दुरुस्तीची मोहीम थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक आयागोकडून 8 ऑक्‍टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. तेलंगणमध्ये एक जानेवारी 2019 ही तारीख मतदानासाठी पात्र ठरण्यासाठी संदर्भ म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.

दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. गुरुवारी (ता.6) चंद्रशेखर राव यांनी राज्य कॅबिनेटची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी तेलंगणा विधानसभा बरखास्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर त्यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा प्रस्ताव आणि आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल एस. एल. नरसिंहन यांच्याकडे सुपूर्द केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले...

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

SCROLL FOR NEXT