RSS
RSS Sakal
देश

संघाचा यापुढे सक्रिय सहभाग नाही

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली - वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणावरून सुरू असलेल्या चर्चेत संघपरिवाराच्या बाजूने नुकतेच सूचक विधान आले. ‘ज्ञानवापी किंवा यापुढील कोणत्याही मंदिर-मशीद वादंगात किंवा आंदोलनात संघ किंवा संघपरिवार थेटपणे उतरणार नाही, असे वरिष्ठ संघसूत्रांनी अनौपचारिकरीत्या बोलताना सांगितले.

रामजन्मभूमी -बाबरी मशीदप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तेव्हा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी निवडक पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी रामजन्मभूमी आंदोलनातील एका विशिष्ट स्थितीत संघ दिवंगत सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या काळापासून सक्रियरीत्या उतरला होता. मात्र यापुढे मंदिरांवर मशीद उभारण्याच्या घटनांबाबतच्या अशा आंदोलनात संघ प्रत्यक्ष सहभागी होणार नाही. त्याची तशी गरजही नाही असे भागवत यांनी नमूद केले होते. संघ नेते सुनील आंबेकर यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना,‘‘ज्ञानवापी मुद्यावर बरीच चर्चा सुरू आहे. मात्र सत्य व तथ्य (पुरावे) सर्वांसमोर आले पाहिजेत'' असे सांगितले.

२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘काशी मथुरा बाकी है‘ या पुढील अध्याय सुरू झाल्याचे वातावरण सध्या आहे. त्या पार्श्वभूमीवर थेट संघाच्या बाजूने आलेले हे विधान महत्वाचे व सूचक मानले जाते. संघसूत्रांच्या मते, वाराणसी, मथुरा व इतर अनेक ठिकाणी मंदिरे पाडून मशिदी बांधल्याचा इतिहास आहे. यातील सत्य परिस्थिती देशासमोर येण्यासाठी न्यायव्यवस्था काम बजावत आहे. संघपरिवार यापुढील आंदोलनात सक्रियपणे सहभागी होणार नाही. मात्र ऐतिहासिक सत्य जगासमोर येणेही आवश्यक आहे. त्यासाठी लोकभावना व लोकांचे आंदोलन हे स्वयंस्फूर्तीने यापुढे उभे राहील. मात्र रामजन्मभूमीप्रमाणे अशा ठिकाणांबाबत संघपरिवाराने सक्रिय भूमिका घेण्याची शक्यता नाही. रामजन्मभूमीचे आंदोलन एका विशिष्ट कालावधीत उभे राहिले होते, असेही सूत्रांनी नमूद केले.

हिंदू महासभा-जामा मशीद

दिल्लीतील ऐतिहासिक जामा मशिदीच्या पायऱ्यांचे उत्खनन करावे अशी मागणी अखिल भारतीय हिंदू महासभेने केली आहे. महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व शाही इमाम बुखारी यांना पत्रेही लिहिली आहेत. जामा मशीद ही मुळात एक मंदिर पाडून उभारण्यात आली होती. या मशिदीखाली आजही अनेक हिंदू देवदेवतांच्या मूर्ती आहेत. त्यामुळे या मशिदीच्या पायऱ्या व आवारात खोदकाम करावे. भारतीय पुरातत्व विभागाने तसे करून यातील सत्य जगासमोर आणावे, अशीही मागणी चक्रपाणी महाराज यांनी पत्रात कली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT