terrorist attack on soldiers in manipur three soldiers martyred 
देश

मणिपूरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला; तीन जवान हुतात्मा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये लष्काराच्या जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला असून, यामध्ये तीन जवान हुतात्मा झाले आहेत. सहा जवान जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इंफाळपासून सुमारे 100 किमी दूर असलेल्या चंदेर जिल्ह्यात बुधवारी (ता. 29) रात्री ही घटना घडली. पीपल्स लिबरेशन आर्मी या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला असून, यात तीन जवान हुतात्मा झाले आहेत. दहशतवाद्यांनी प्रथम आयईडीचा स्फोट घडवून आणला. त्यानंतर जवानांवर अंधाधूंद गोळीबार केला. यावळी तीन जवान हुतात्मा झाले तर सहा जवान जखमी झाले होते. जखमी जवानांना इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लष्कराने दहशतवाद्यांविरोधात जोरदार शोधमोहीम हाती घेतली आहे. तसेच भारत आणि म्यानमारच्या सीमेवरही सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये चंदेल जिल्ह्यातच आसाम रायफल्सच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी लष्करी तळावर बॉम्ब फेकले. त्यानंतर दोन्हीकडून गोळीबार झाला होता. मात्र, त्या हल्ल्यात लष्कराची कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळाची अधिसूचना शनिवारपर्यंत, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Tata Group: टाटा समूहाच्या वादात शरद पवारांची एन्ट्री! टाटा ट्रस्टबाबत पोस्ट करत म्हणाले...

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

Balasaheb Thorat : यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा;प्रांत कार्यालयात घुसून ठिय्या

Marathi News Live Updates : ईडीचे पंजाब आणि हरियानात २५ ठिकाणी छापे

SCROLL FOR NEXT