Sasikala  
देश

तमिळनाडू: अण्णाद्रमुक माझ्‍यामुळे एकसंध; शशिकला यांचा दावा

विनायक होगाडे

चेन्नई : तमिळनाडूतील राजकारणात परत येऊन अण्णाद्रमुक पक्षावर पुन्हा ताबा मिळविण्याचे अथक प्रयत्न व्ही. के. शशिकला यांनी सुरू केले आहेत. पक्षाचे सर्वेसर्वा ‘एम.जी. रामचंद्रन ऊर्फ ‘एमजीआर’ यांच्या मृत्यूनंतर पक्षात फूट पडली होती. पण ‘जानकी’ व ‘जयललिता’ या दोन गटांना एकत्र आणण्यासाठी मध्यस्ती केल्याचा मोठा दावा शशिकला यांनी गुरुवारी केला.

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या शशिकला यांना अण्णाद्रमुकने बेदखल केले आहे. अखेर राजकारणातून संन्यास घेत असल्याचे शशिकला यांनी जाहीर केले होते. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे पानिपत झाल्यावर आता त्या पुन्हा सक्रिय झाल्या असून पक्षाची सूत्रे हाती घेण्यासाठी त्यांनी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शशिकला त्यांच्या समर्थकांना दूरध्वनी करीत असून पक्षाला तारण्यासाठी त्या परत राजकारणात येणार असल्याची ग्वाही त्या देत आहे. तुथुकुडी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी बोलताना शशिकला यांनी पक्ष एकसंध राहावा यासाठी मध्यस्ती केल्याचा दावा केला. त्यांच्या दूरध्वनीवरील संवादाच्या ध्वनिफिती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

तमिळनाडूत १९७७ पासून दहा वर्षे ‘एमजीआर’ यांच्या नेतृत्वाखालील अण्णाद्रमुकची निर्विवाद सत्ता होती. डिसेंबर १९८७ मध्ये त्यांचे निधन झाले अन पक्ष दोन गटात विभागला. एका रामचंद्रन यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन यांनी एका गटाचे नेतृत्व हाती घेतले तर जयललिता यांचा एक गट तयार झाला होता. १९८९मधील विधानसभेच्या निवडणुकीत अंदीपट्टी मतदारसंघातून जो अण्णाद्रमुकच्या बालेकिल्ला समजला जातो, तेथून उभ्या असलेल्या जानकी यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी राजकारणातून माघार घेतल्याने दोन्ही गटांच्या एकत्रिकरणाचा मार्ग मोकळा झाला. यावर या दोन्ही गटांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा आता शशिकला करीत आहेत. ‘एमजीआर’ यांच्याही चर्चा होत असे. पक्षातील घडामोडींची माहिती त्यांना मी दिली होती, असे त्या सांगतात. त्याचबरोबर जयललिता जेव्हा रागाने व घाईघाईने निर्णय घेत असत, तेव्हा मी त्यांना डोके शांत ठेवण्याचा सल्ला देत असे, अशी त्यांनी ध्वनिफितीत म्हटले आहे.

पक्षात ऐक्य आणणार

अण्णाद्रमुकचे सारस्थ हाती घेण्यास उत्सुक असलेल्या शशिकला म्हणाल्या, की ‘एमजीआर’ आणि जयललिता यांचे स्वप्न पूर्ण करण्यास मी बांधिल आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ‘एमजीआर’ यांच्‍या कुटुंबीयांची माझी भेट घेऊन

राजकारणात पुन्हा सक्रिय होऊन पक्षाला बचाव करण्याची गळ घातली होती. के. पलानीस्वामी आणि ओ. पनीरसेल्‍वम हे वेगळ्या दिशेने जात असल्याने पक्षाच्या विकासावर परिणाम होत असल्याची टीका त्यांनी केली. यामुळेच मला पक्षात पुन्हा ऐक्य निर्माण करायचे आहे, असेही शशिकला यांनी सांगितले.

शशिकलांचा दावा खोटा?

शशिकला यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना अण्णाद्रमुकचे नेते म्हणाले की, ‘एमजीआर’ यांनी जयललिता यांची प्रचार चिटणीसपदी नियुक्ती केली तेव्हापासून शशिकला त्यांच्याबरोबर आहे, हे खरे आहे. मात्र पक्षातील दोन गटांना एकत्र आणण्यात त्यांचा काहीही संबंध नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: रोहित शर्मा Impact Player म्हणून खेळणार? सराव सुरू; मुंबई इंडियन्सची Playing XI कशी असणार?

Education Department: शिक्षण विभाग ‘मनोहर’वर मेहरबान; देवळी कला मारहाण प्रकरण, शिक्षकावर कारवाई केव्हा?

HPCL Jobs Alert: सरकारी नोकरीचा बंपर चान्स! डिप्लोमा ते CA उमेदवारांसाठी लाखोंच्या पगारासह HPCL मध्ये 700+ जागा, असा करा अर्ज

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषदेचा 301 कोटींचा अर्थसंकल्प सादर; मागील वर्षापेक्षा 9 कोटींची वाढ

प्रचंड दारू प्यायलेले राजेश खन्ना रात्री ३ वाजता टेरेसवर गेले आणि... तो आवाज ऐकून डिंपलही धावत गेल्या, सांगितला तो किस्सा

SCROLL FOR NEXT