रघुराम राजन Sakal
देश

Raghuram Rajan : विकसित भारताचे स्वप्न अद्यापही कोसो दूर ; रघुराम राजन यांचे मत

मनुष्यबळाचा कौशल्य विकास हवा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ‘‘ भारत २०४७ पर्यंत विकसित देश होऊ शकत नाही याबाबत बोलणे देखील मूर्खपणा ठरेल. देशातील अनेक मुले आजही उच्चशिक्षणापासून वंचित असून शाळांतून होणाऱ्या गळतीचे प्रमाण देखील अधिक आहे,’’ असे प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी ‘ब्लूमबर्ग’ला दिलेल्या मुलाखतीत केले. देशाच्या आर्थिक विकासाबाबत उगाच बढाई मारून आपण खूप मोठी चूक करत आहोत. आपल्याला खरोखरच काही ठोस प्राप्त करायचे असेल तर आधी काही मोठ्या समस्यांचे निराकरण करावे लागेल. मनुष्यबळाला उत्तम शिक्षण देऊन त्यांच्यातील कौशल्याचा विकास घडवून आणणे हेच सर्वांत मोठे आव्हान असल्याचे राजन यांनी स्पष्ट केले.

राजन म्हणाले की, ‘‘ चुकीच्या गृहितकांवर विश्वास ठेवून भारत मोठी चूक करू शकतो. सध्या जे वलय निर्माण केले जात आहे ते प्रत्यक्षात येण्यासाठी देखील खूप मेहनत करावी लागली आहे. जनतेने एखाद्या विशिष्ट वलयावर विश्वास ठेवावा, असा राजकीय नेत्यांचा आग्रह असतो. भारताने जर अशा गृहितकांवर विश्वास ठेवला तर ती एक गंभीर चूक ठरू शकते.’’

त्याकडे मात्र दुर्लक्ष

केंद्र सरकार चीपनिर्मिती उद्योगावर लक्ष केंद्रित करत आहे त्याबाबत बोलताना राजन म्हणाले, ‘‘ देशाला महान राष्ट्र बनविण्याची सरकारची महत्त्वाकांक्षा खरी आहे पण त्यासाठी काय करायला हवे ही मात्र वेगळी गोष्ट आहे. सध्या आपण प्रतिष्ठेच्या उद्योगांवरच थांबलो आहोत हीच माझ्यासाठी खरी चिंतेची बाब आहे पण हे सगळे काही त्या उद्योगाच्या वाढीसाठी चिरंतन ठरेल का? याकडे मात्र आपण पूर्णपणे दुर्लक्ष करत आहोत.’’ रघुराम राजन यांनी यापूर्वीही भारताच्या विकासाबाबत केलेल्या दाव्यांवर टीका केली होती.

चीनकडून काय शिकायला हवे

आपल्याला काय हवे? हा एक व्यावहारिक विचार आहे असे सांगत राजन यांनी चीनचे माजी नेते डंग शाओपिंग यांच्या विधानाचा दाखला दिला. ‘‘ डंग यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, भारताने चीनकडून काय शिकायला हवे तर मांजर काळे असो अथवा पांढरे याचा काही फरक पडत नाही ते उंदीर पकडते की नाही हा खरा प्रश्न आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hinjewadi IT Park : हिंजवडी आयटी पार्कमध्ये १०० हून अधिक एनएसजी कमांडोंचा ताफा; बुधवारी रात्री पुण्यातील आयटी पार्कमध्ये थरार

WTC Points Table Update : पाकिस्तानच्या विजयानंतर गुणतालिकेत उलथापालथ; भारताचे फायनलमध्ये पोहोचण्याचे समीकरण बिघडले?

लोकसभेत मोठा ट्विस्ट! विरोधकांच्या २२ खासदारांमुळे गणित बदलणार! दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्यापासून NDA किती दूर?

Marathi News Live Updates : प्रशांत किशोर सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल

Para Athletics: राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या मराठमोळ्या दिलीप गावितचा निर्धार; पॅरा आशियाई स्पर्धेत जागतिक विक्रमाचे लक्ष्य

SCROLL FOR NEXT