rohini court explosion sakal
देश

दिल्लीतील रोहिणी कोर्टात झालेल्या स्फोटाने खळबळ

दिल्लीतील रोहीणी कोर्टातआज सकाळी झालेल्या स्फोटाने खळबट उडाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली (Delhi) : दिल्लीतील रोहीणी कोर्टात (Delhi rohini court) आज सकाळी झालेल्या स्फोटाने खळबट उडाली आहे. रोहिणी कोर्टात आज १०२ नंबरच्या कोर्टात सकाळी हा संशयास्पद स्फोट झाला. खबरदारी म्हणून अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती वृत्तसंस्था एएनआयने दिली.

दिल्लीच्या रोहिणी कोर्टात झालेल्या स्फोटात दोघांना किरकोळ दुखापत झाल्याचं समजते. त्यांना कॅट्स अॅम्ब्युलन्समधून रुग्णालयात नेण्यात आलं आहे. रोहिणी जिल्ह्याची डीसीपी आणि एसीपी घटनास्थळी दाखल झाले आहेत. यावेळी पोलिसांच्या तपास पथकाला प्रथम दर्शनी अशी माहिती मिळाली की, कोर्ट नंबर १०२ मध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ब्लास्ट झाला होता. गुरुवारी सकाळी रोहिणी कोर्टात स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने एकच धावपळ उडाली.

स्फोटानंतर हा परिसर रिकामी करण्यात आला असून पोलिस चौकशी करत आहेत. त्यामुळे न्यायालय परिसरात मोठी घबराट पसरली. दरम्यान या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याचं कळतंय.

२४ सप्टेंबर रोजी उच्च सुरक्षाव्यवस्थेने सुसज्जित रोहिणी न्यायालय टोळीयुद्धातून झालेल्या गोळीबाराने हादरले होते. या घटनेत एका कुख्यात गुंडाची हत्या झाली होती. सुरक्षारक्षकांना त्याच्या मारेकऱ्यांचा खात्मा केला होता. त्यानंतर या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपच्या बालेकिल्ल्याला पोटनिवडणुकीत सुरुंग, प्रशांत किशोर विजयाच्या दिशेनं; भाजप उमेदवार पराभवाच्या छायेत

DK Shivakumar Cabinet : डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात तब्बल 20 नव्या चेहऱ्यांची एन्ट्री! पाहा, कोणत्या आमदारांचं उजळलं नशीब? शपथविधीची वेळही ठरली!

Team India New Coach: गौतम गंभीरच्या टीममध्ये मोठा बदल! श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघासाठी नव्या कोचची घोषणा

'त्यांना ओरडायचं ठरवलेलं, पण...' संजीव कुमारला शेवटचंही भेटू शकले नाहीत सचिन पिळगांवकर, म्हणाले...

Latest Marathi News Live Update : खडकवासला धरणातून दुपारी 3 वाजता मुठा नदीत 29,117 क्युसेक विसर्ग; पाटबंधारे विभागाचा महत्त्वाचा इशारा

SCROLL FOR NEXT