Stop flyover construction until quality inspection say vinayak raut 
देश

विधेयकांची संख्या जास्त; संसदेच्या कामकाजाची वेळ वाढवा: विनायक राऊत

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्या 29 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. त्याआधी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक झाली आहे. या बैठकीबाबत बोलताना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय की, संसदेच्या कामकाजाची वेळ वाढविण्याची गरज आहे. कारण 19 दिवस हे अधिवेशन चालणार आहे. पण त्यात 31 विधेयके मांडली जाणार आहेत. पुढे त्यांनी म्हटलंय की, कृषी विधेयके मागे घेतली जात आहेत मात्र, शेतकऱ्यांचे बळी देखील गेले आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने काही बळी घेतले आहेत. त्यामुळे मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकारने बोलावलेल्या या सर्वपक्षीय बैठकीत अनेक विरोधी पक्षांनी पेगासस पाळत प्रकरण, महागाई आणि बेरोजगारी यावर चर्चेची मागणी केली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या बैठकीला उपस्थित प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे, अधीर रंजन चौधरी आणि आनंद शर्मा, टी.आर. द्रमुककडून बाळू आणि तिरुची शिवा, राष्ट्रवादीकडून शरद पवार, शिवसेनेकडून विनायक राऊत, समाजवादी पक्षाकडून रामगोपाल यादव, बसपकडून सतीश मिश्रा, बीजेडीकडून प्रसन्न आचार्य आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT