Loksabha Election 2024 esakal
देश

Loksabha Election 2024 : महिला उमेदवारांचा टक्का कमीच ‘यूपी’तील पहिल्या टप्प्यातील स्थिती

भाजपप्रमाणेच काँग्रेस आणि अन्य पक्षांनी देखील येथे प्रचाराची राळ उडवून दिली आहे

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली ः देशातील सर्वांत मोठे राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तरप्रदेशात पहिल्या टप्प्प्यामध्ये आठ मतदारसंघांत मतदान होत असून स्थानिक यंत्रणेने पण त्यासाठी कंबर कसली आहे. भाजपप्रमाणेच काँग्रेस आणि अन्य पक्षांनी देखील येथे प्रचाराची राळ उडवून दिली आहे. एरव्ही महिला प्रतिनिधीत्वाचा मुद्दा जोरकसपणे मांडणाऱ्या सर्वच पक्षांनी महिला नेत्यांना उमेदवारी देताना मात्र हात आखडता घेतल्याचे दिसून येते.

२०२४ मधील स्थिती

मतदारसंघ

८०

उमेदवार रिंगणात

८.७५ टक्के (७)

महिला उमेदवार

२०१९ मधील स्थिती

९१

रिंगणातील उमेदवार

७१

नामांकन

फेटाळले

विजयी उमेदवार

१५५

नामांकन दाखल

केलेले उमेदवार

१३. १८ टक्के (१२)

महिला उमेदवार

अशाही महिला उमेदवार

कैराना, मोरादाबाद अन् सहारनपूरमध्ये दोन महिला उमेदवार मैदानात उतरल्या असून मुझफ्फरनगरमधून एक महिला निवडणूक लढवीत आहे. बिजनौर, पिलीभीत, रामपूर आणि नगिना येथून एकही महिला उमेदवार नसल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. कैरानातून समाजवादी पक्षाच्या इकरा चौधरी आणि राष्ट्रीय मजदूर एकता पक्षाच्या प्रीती कश्यप मैदानात आहेत. मोरादाबादमधून समाजवादी पक्षाच्या रूची विरा आणि अपक्ष म्हणून साधना सिंह मैदानात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना अटक

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

TET Exam Date : टीईटी परीक्षेची तारीख ठरली, परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क 'या' तारखेपासून भरता येणार

SCROLL FOR NEXT