बीबी मुस्कान खान बीबी मुस्कान खान
देश

हिजाबचे राजकारण यूपीत : ‘त्या’ विद्यार्थिनीसाठी जमियत उलेमा-ए-हिंदची घोषणा

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटकातील कॉलेजमधील हिजाब वादाचे राजकारण उत्तर प्रदेशात पोहोचले आहे. जमियत उलेमा-ए-हिंदचे (Jamiat Ulema-e-Hind) अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी कर्नाटकातील उडुपी येथील बीबी मुस्कान खान हिला ५ लाखांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की कर्नाटकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तरुण ‘जयश्री राम’चा नारा देताना दिसत आहेत. त्याच्या निषेधार्थ बुरखा घातलेली मुस्कान खान ही विद्यार्थीनी ‘अल्लाह हू अकबर’च्या घोषणा देताना दिसत आहे.

कर्नाटकातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भगवे डुपट्टे परिधान केलेले काही तरुण ‘जयश्री राम’चा नारा देताना दिसत आहेत. मात्र, त्याच्या निषेधार्थ बुरखा घातलेली मुस्कान खान ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देऊ लागते. दोघांकडून घोषणाबाजी सुरू असल्याचे पाहायला मिळते.

मुस्कान ही कर्नाटकातील (Karnataka) उडुपी येथील कॉलेजची विद्यार्थिनी आहे. कॉलेजमध्ये हिजाबवर बंदी असतानाही ती हिजाब घालून कॉलेजमध्ये जाते. अशा परिस्थितीत जमियत उलेमा-ए-हिंदचे (Jamiat Ulema-e-Hind) अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी मुस्कानला पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. मौलाना महमूद मदनी यांनी जमियत उलेमा-ए-हिंदचा हा निर्णय फेसबुक पोस्टद्वारे शेअर केले आहे. जमियतच्या अधिकृत वेबसाइटवर उर्दूमध्ये लिहिलेला एक लेख अपलोड केला आहे. जिथे मौलाना मदनी यांनी मुस्कानचे वर्णन धाडसी मुलगी असे केले आहे.

मौलाना मदनी यांनी कर्नाटकची (Karnataka) विद्यार्थिनी बीबी मुस्कानचे अभिनंदन केले आहे. देशातील मुलींनी त्यांच्या घटनात्मक आणि धार्मिक अधिकारांबाबत जागरूक असले पाहिजे, असे मौलाना मदनी म्हणाले. सोबतच धार्मिक अधिकारांना विरोध करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही सरकारकडे केली आहे. यासोबतच माजी खासदार आणि जमियतचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी आंदोलक विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT