Then Prime Minister Pandit Jawaharlal Nehru, PM Narendra Modi And Vladimir Putin Esakal
देश

Jawaharlal Nehru Cow: किस्सा दोस्ती का! रशियाने नेहरूंना का गिफ्ट केली होती गाय? वाचा काय आहे प्रकरण

India Russia Friendship: रशिया आणि भारताच्या मैत्रीची मुळे इतिहासात खोलवर रुजलेली आहेत. गेल्या 75 वर्षांपासून चालत आलेले भारत-रशिया मैत्रीपूर्ण संबंध मोदी आणि पुतिन पुढे घेऊन जात आहेत.

आशुतोष मसगौंडे

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशिया दौऱ्यावर आहेत. रशिया आणि भारताच्या मैत्रीची मुळे इतिहासात खोलवर रुजलेली आहेत. गेल्या 75 वर्षांपासून चालत आलेले भारत-रशिया मैत्रीपूर्ण संबंध मोदी आणि पुतिन पुढे घेऊन जात आहेत. मोदींच्या या रशिया दौऱ्याच्या निमित्ताने आपण इतिहासातील एक असा किस्सा जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये भारताचे त्यावेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना रशियाने भेट म्हणून गाय दिली होती.

जवाहरलाल नेहरूंनी भारत आणि सोव्हिएत युनियन संबंधांचा पाया रचला. 1927 मध्ये रशियाला भेट दिल्यानंतर, नेहरूंनी ठरवले की भारतानेही सामाजिक न्याय, समानता आणि मानवी प्रतिष्ठेवर जोर देणाऱ्या सोव्हिएत युनियन मॉडेलचे अनुसरण केले पाहिजे.

नेहरूंनी भारत आणि सोव्हिएत युनियन यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध हळूहळू वाढवले. यामुळे पुढे द्विपक्षीय अजेंडा, राष्ट्रीय हिताचे महत्त्वाचे मुद्दे आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सोव्हिएत युनियनने भारताला नेहमीच महत्त्वाचा राजकीय आणि धोरणात्मक पाठिंबा दिला.

अन् नेहरूंना भेटवस्तू म्हणून गाय मिळाली

भारतातील रशियन दूतावासाच्या वेबसाइटनुसार, 27 मार्च 1960 रोजी जवाहरलाल नेहरू पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा सोव्हिएत युनियनला गेले. यावेळी सोव्हिएत सरकारने त्यांना एक गाय भेट दिली होती.

वेबसाइटवरील माहितीनुसार,यावेळी सोव्हिएत राजदूत इव्हान बेनेडिक्टोव्ह आणि त्यांच्या पत्नीने गायीची दोरी नेहरूंच्या हाती दिली तेव्हा त्यांनी ताबडतोब गायला चारा खाऊ घालायला सुरुवात केली. दोन्ही देशांसाठी हा क्षण खूप संस्मरणीय होता.

Then Prime Minister Pandit Jawaharlal Nehru Receiving Cow As Gift From Russia

'यामुळे' नेहरूंना रशियाने दिली गाय'

स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या काही वर्षांमध्ये भारतात प्रचंड दुष्काळ, अन्न धान्य आणि दुधाचाही मोठा तुचवडा निर्माण झाला होता. या सर्वातून भारताने सावरावे यासाठी रशियाने नेहरूंना गाय भेट देत प्रतिकात्मक पाठिंबा दिला होता.

भारतातील दुधाचा तुटवडा इतका होता की, 1950 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात दरवर्षी 55,000 टन दुधाची पावडर आयात करावी लागत असे, असे सरकारी नोंदींमध्ये नमूद करण्यात आले आहे.

रशिया अन् भारताचा शोध

आजपर्यंत आपण इतिहासाच्या पुस्तकांमधून भारताचा शोध वास्को डी गामा यांना लावल्याचे शिकत आलो आहोत. पण भारतातील रशियन दूतावासाच्या वेबसाइटनुसार, व्यापारी आणि खलाशी अफानासी निकितिन हे भारताला भेट देणाऱ्या पहिल्या युरोपीय लोकांपैकी एक होते. वास्को डी गामा आणि इतर पोर्तुगीजांच्या अनेक वर्षे आधी त्यांनी भारताचा शोध लावला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Sushila Karki Government : नेपाळच्या सुशीला कार्की सरकारचा मोठा निर्णय! आंदोलनात जीव गमावलेल्या ‘Gen-Z’ ना शहीद दर्जा!

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर भारताच्या सायलंट किलरला मिळालं 'इम्पॅक्ट प्लेअर' मेडल; पाहा ड्रेसिंग रुममधील Video

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Priyank Kharge statement : प्रियांक खर्गेंंचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान! ; निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला पडणार महागात?

Latest Marathi News Updates : एससी आरक्षण बदलल्याचा खोटा प्रचारः राहुल डंबाळे

SCROLL FOR NEXT