Yellow Tomato
Yellow Tomato esakal
देश

Yellow Tomato: टमाटरसारख्या दिसणाऱ्या या फळाची बाजारपेठेत चर्चा! फायदे वाचाल तर थक्क व्हाल

साक्षी राऊत

Fruit Benefits: एका क्षणासाठी हे फळ बघता तुम्हाला टमाटरच असल्याचा भास होईल. होय, टमाटरसारख्या दिसणाऱ्या या फळाची सध्या बाजारपेठेत तुफार चर्चा सुरू आहे. मात्र हे फळ भारतीय नसून चीनमधलं आहे. बाजारपेठेत चर्चा असणाऱ्या या खास फळाबाबत आणि त्याच्या फायद्यांबाबत जाणून घेऊया.

इंग्रजीमध्ये या फळाला 'परसिमन' असं म्हणतात. परसिमन हे चीनी फळ भारतीय बाजारपेठांमध्ये लोकप्रिय आहे. थंडीच्या दिवसांत हे फळ खाल्ल्यास इम्युनिटी वाढण्यास मदत होते. तसेच अनेक आजारांपासून तुमचे रक्षण होते. परसिमनमध्ये असलेले पोषक तत्वे तुमचा आजारांपासून बचाव करते. याला मराठीत अमरफळ असे म्हणतात.

अमरफळाचे फायदे

  • अमरफळाचे फायदे पाहता या फळाला सुपरफुड्सच्या लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. यामध्ये व्हिटीमीन इ, के, बी1, बी2, फोलेट, पोटॅशियम, कॉपर आणि इतर पोषक तत्त्व असतात. यामध्ये मॅग्नेशियम आणि फॉस्फरस आणि मॅग्नेशियम भरपूर असतं.

  • अमरफळामध्ये एंटीऑक्सिडंट्स इम्यून सिस्टला मजबूत करतात. यामुळे तुमचं शरीर रोगांची लढण्यासाठी उत्तम होतं. हे मौसमी आजारांदरम्यान शरीर निरोगी ठेवतं. (Health)

  • अमरफळामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स आणि क्वेर्सेटिन हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करतात. हे फळ मल्टीविटामिनसाठी एक उत्तम स्रोत मानला जातो.

  • हिवाळ्यामध्ये अनेकांचं वजन वाढू लागतं. अशावेळी या फळांचं सेवन केल्याने भूक कमी लागते. याशिवाय तुम्ही जास्त प्रमाणात खातंही नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT